US Fighter Jet Crash : अमेरिकेचं फायटर जेट कोसळलं; आगीचा गोळा बनलं, पण पायलट सुखरुप, पाहा VIDEO
esakal March 03, 2026 03:45 AM

US Military Aircraft Crash In Kuwait Both Crew Members Safe इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध पेटलंय. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. दरम्यान, अमेरिकेचं एफ १५ हे फायटर जेट कुवैतमध्ये कोसळल्याची घटना घडलीय. लढाऊ विमान उडवणारा पायलट आणि त्यांचा सहकारी या दुर्घटनेतून सुखरूप वाचले आहेत. सोशल मीडियावर विमान दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात विमानाला आग लागल्यानंतर ते खाली कोसळत असल्याचं दिसतंय.

अमेरिकेच्या लढाऊ विमानाचं इंजिन बंद पडल्यानं ते क्रॅश झालं. इस्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ले केले जात असतानाच अमेरिकेचं लढाऊ विमान कोसळल्यानं खळबळ उडाली आहे. फ्रेंडली फायरमुळे हे क्रॅश झाल्याचं सांगण्यात येतंय. अमेरिकन किंवा सहकाऱ्यांकडून चुकून आपल्याच विमानाला टार्गेट केलं गेल्यानं हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे.

कुवैतमध्ये क्रॅश झालेलं विमान अमेरिकेचं होतं. अमेरिकेच्या लष्कराचं विमान कुवैतमध्ये आहे. अली अल सलेम एअरबेसवर अमेरिकन लष्कराची विमानं उतरवली जातात. कुवैतकडूनही एफ १५ फायटर जेटचा वापर केला जातो. पण जे विमान कोसळलं ते अमेरिकेचं होतं. या विमानाच्या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

खामेनेई ४५ वर्षांपासून लपवायचे उजवा हात, म्हणायचे, मला एका हाताची गरज नाही

विमान दुर्घटनेच्या व्हायरल होत असलेल्या दोन व्हिडीओपैकी एका व्हिडीओत विमान क्रॅश होत असल्याचं दिसतंय. यात विमान घिरट्या घालत अचानक जमिनीच्या दिशेने येतं. त्याच वेळी विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने पायलटने उडी मारल्याचं दिसतं. तर दुसऱ्या एका व्हिडीओत पायलट कारमध्ये बसल्याचं दिसतंय. रुग्णवाहिका आल्यानंतर त्यातून उपचारासाठी त्यांना नेलं जातं.

अमेरिकेचं एफ १५ हे लढाऊ विमान दोन इंजिनचं असून कोणत्याही वातावरणात हल्ला करण्याची त्याची क्षमता आहे. सध्या बोइंग कंपनीचा भाग असलेल्या मॅकडॉनेल डग्लसने हे तयार केलं आहे.

१९७० पासून हे विमान सेवेत आहे. याचा कमाल वेग ३ हजार किमी प्रतितास इतका आहे. हे अमेरिकेचं सर्वात वेगवान लढाऊ विमान असून याची रेंज ५ हजार ५५० किमीपर्यंत आहे. तसंच १३ हजार किलोपेक्षा जास्त वजन ते वाहून नेऊ शकतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.