Khandesh Expressway: जळगाव ते मुंबई ५ तासात; 'खान्देश एक्सप्रेस वे' थेट समृद्धी महामार्गाशी जोडणार
Saam TV March 03, 2026 06:45 AM

जळगावरवरुन मुंबई फक्त ५ तासात

जळगाववरुन छत्रपती संभाजीनगरला खान्देश एक्सप्रेस वे

३-४ तासांचा वेळ वाचणार

राज्य सरकार समृद्धी महामार्गाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे काम कुठपर्यंत आहे असा प्रश्न विधान परिषदेच्या कामकाजात विचारण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारने माहिती दिली आहे. यावरुन जळगाव ते छत्रपती संभाजीनगर खान्देश एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.

Vande Bharat Sleeper Train : आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार, कोणता असेल मार्ग, वाचा सविस्तर

जळगावते छत्रपती संभाजीनगरवरील वाहतूक अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने मागच्या वर्षी जून महिन्यात महत्त्वाची बैठक पार पडली.यामध्ये चर्चा झाली होती.

सध्या छत्रपती संभाजीनगरहून समृद्धी महामार्गवरुन मुंबईला येण्यासाठी ४ तास लागतात. त्यामुळे जर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास एक तासाचा झाला तर जळगावला खूप फायदा होणार आहे. जळगावहून मुंबईला फक्त ५ तासात पोहचता येणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा ते मुंबईला पोहचणे खूप सोपे होणार आहे.

याचसोबत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हामार्ग प्रस्तावित आहे. या एक्सप्रेस हायवेमुळे जळगावहून पुण्याला पोहचण्यासाठीचा वेळ कमी लागणार आहे. जळगावहून माळेगाव, नाशिकवरुन मुंबईला येतात. यासाठी ७-८ तास लागतो. परंतु आता जळगावहून जर छत्रपती संभाजीनगरला जोडले तर समृद्धी मार्गावरुन मुंबईला येण्याचा वेळ वाचेल. जळगावहून मुंबईला तुम्ही ५ तासात पोहचणार आहे. यामुळे ३ ते ४ तासांचा वेळ वाचणार आहे.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा वाहतूक कोंडी, खंडाळ्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा; पाहा VIDEO

खान्देश एक्सप्रेस वे

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग १०५ किमी लांब आहे. या मार्गाला खान्देश एक्स्प्रेस वे म्हटले जाते. हा महामार्ग पुढे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. सध्या महामार्गाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.

Samruddhi Expressway : ‘समृद्धी’वर पोहोचण्यासाठी लागणार १०० रुपये, आमणे-ठाणे प्रस्तावित मार्गावर टोलचा प्रस्ताव
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.