कोल्हापूर : यवत (जि. पुणे) येथील १० - १५ महिलांचा ग्रुप आज अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आला होता. विद्यापीठ गेटजवळील पार्किंगच्या रस्त्यावर आल्यानंतर त्यांना रोखण्यात आले. गाडी इकडे लावू शकत नाही पुढे जा, अशा सूचना तेथील कर्मचाऱ्यांनी दिल्या.
तसे या पर्यटकांनी गाडी पद्माराजे हायस्कूलजवळ गाडी लावली आणि भरउन्हात त्या चालत येऊ लागल्या. गुडघ्याचा त्रास असलेल्या वयस्कर महिला तर घामाघूम झाल्या. देवीचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर येताच चालकाला फोन केला. मात्र, वनवे असल्याने येऊ शकत नाही, चालतच या, असा सल्ला त्याने दिला.
पुन्हा एवढेच अंतर उन्हात चालत जायचे, या विचाराने त्या सर्वांच्याच पोटात गोळा आला. हे एक प्रातिनिधिक उदाहरण. असा त्रास मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना सहन करावा लागतो आहे.
Premium|Badrinath Temple: गंधर्वांनी मंतरलेली पहाट; बद्रीनाथच्या प्रवासातील अलकनंदेच्या किनारी अनुभवकरवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरातील विद्यापीठ गेटजवळील चारचाकी वाहनांचे पार्किंग बंद करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, या निर्णयामुळे पर्यायी व्यवस्था न केल्याने पर्यटकांना आणि भाविकांना उन्हातान्हात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोल्हापूरच्या पर्यटन विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना, प्रत्यक्षात भाविकांना मिळणारी ही वागणूक प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चितविद्यापीठ गेटजवळील पार्किंग हे मंदिराच्या अत्यंत जवळ असल्यामुळे भाविकांसाठी ते मोठे सोयीचे होते. विशेषतः परगावाहून येणारे भाविक आपली वाहने येथे सुरक्षितपणे लावून काही पावलांवरच असलेल्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचत असत.
आता, मात्र दुसरे पार्किंग शोधण्याच्या नादात अनेकदा भाविक शहराच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अडकून पडतात, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी अधिकच जटिल होत आहे.
पिक अप अँड ड्रॉपची व्यवस्था हवीविद्यापीठ हायस्कूलजवळ सरसकट चारचाकी वाहनांना बंदी करणे भाविकांना मनस्ताप देणारे ठरत आहे. यापेक्षा भाविकांसाठी या ठिकाणी पिक अप अँड ड्रॉप, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र, सर्वसामान्य भाविकांची चारचाकी वाहन सोडणारच नाही, हा अट्टाहास अनेक भाविकांना मनस्ताप देणारा ठरत आहे.
सोयीपेक्षा त्रासाचेच डोंगरविद्यापीठ गेटकडील पार्किंग बंद केल्यामुळे केवळ पर्यटकांचेच हाल होत नाहीत, तर मंदिर परिसरातील वाहतूक व्यवस्थेचाही बोजवारा उडाला आहे. अनेक पर्यटक रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे गाड्या लावतात, ज्यामुळे स्थानिक नागरिकांनाही त्रास होत आहे. स्वच्छतागृहांचा आधीच अभाव असताना आणि त्यात आता ही पार्किंगची समस्या आल्याने कोल्हापूरच्या आदरातिथ्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
उन्हाचा बसतो चटकासध्या कोल्हापुरात उन्हाळ्याचा कडाका वाढला आहे. तापमान ३२ - ३४ अंशांच्या आसपास असताना, लांब अंतरावर गाडी पार्क करून मंदिरापर्यंत पायी चालत येताना भाविकांची मोठी दमछाक होत आहे.
ज्या भाविकांसोबत लहान मुले, वृद्ध व्यक्ती किंवा दिव्यांग नातेवाईक आहेत, त्यांच्यासाठी तर हा प्रवास एखाद्या अग्निदिव्यापेक्षा कमी नाही. घामाघूम अवस्थेत आणि उन्हाचे चटके सहन करत भाविक मंदिरापर्यंत पोहोचतात, तिथे पुन्हा दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. दर्शनानंतर पुन्हा तेवढ्याच लांब अंतरावर असलेल्या पार्किंगपर्यंत चालत जाताना अनेकांच्या पायाला फोड येत आहेत.
पर्यटकांनी ‘सकाळ’कडे अनुभव पाठवावेतविद्यापीठ गेटकडील पार्किंग बंद केल्यामुळे पर्यटकांचेच हाल होत आहेत. पर्यटकांनी असे अनुभव ‘सकाळ’कडे पाठवेत. अनुभव पाठविण्यासाठी व्हॉटस् अॅप क्रमांंक - ९१४६१९०१९१