Maharashtra Live Updates: धूलीवंदन निमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवेच्या वेळेत बदल
Sarkarnama March 03, 2026 12:45 PM
लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे ₹१५०० महिलादिनी म्हणजे 8 मार्च रोजी मिळणार, असे सांगण्यात येत आहे. रांजणगावात जमीन हादरली; नागरिकांमध्ये घबराट

पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गावांमध्ये सौम्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. अचानक जमिनीला हलकासा कंपन जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

धूलीवंदन निमित्त पुणे मेट्रोची प्रवासी सेवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आज सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत पुणे मेट्रो बंद राहणार आहे. दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरू राहील, असे प्रशासनाने कळवले आहे.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.