जालना : येथे मंजूर झालेला देशातील पहिला ड्रायपोर्ट आता एका महिनाभरात कार्यान्वित होणार असून, मराठवाड्यासह विदर्भातील वस्तूंची आयात-निर्यात करणे आता शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असून, औद्योगिक व कृषी विकासाला चालना मिळणार आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए), राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक्स व्यवस्थापन लिमिटेड (एनएचएलएमएल) यांच्यातर्फे ‘नागपूर एमएमएलपी लिमिटेड’ मार्फत येथे ‘मल्टी मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क’ (ड्रायपोर्ट) ४२५ एकरांवर विकसित केला जात आहे. पहिल्या टप्प्यात ६४ एकरांवर सर्व सोयी-सुविधा विकसित केल्या असून, येत्या एप्रिलपासून प्रत्यक्ष वस्तूंची आयात-निर्यात केली जाणार आहे. पुढील १५ वर्षांसाठी ड्रायपोर्टच्या संचालनाची जबाबदारीही ‘विकास कोल ॲण्ड मिनरल्स’ या खासगी
कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. रस्ते, रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे येथून अधिक मालवाहतूक क्षमता असणार आहे. येथे वस्तूंसाठी एकत्रीकरण, प्रक्रिया, असेंबलिंग, साठवण व वितरण अशा विविध लॉजिस्टिक्स सेवा उपलब्ध असतील. त्यामुळे हा प्रकल्प मराठवाड्यासह विदर्भाच्या औद्योगिक, कृषी विकासासाठी ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार आहे.
पहिल्या टप्प्यात या सुविधांची उभारणीड्रायपोर्टचे गेट्स, १ वजन काटा, वजन काटा कक्ष
वेअर हाउस ( सुमारे ४६०८ चौ.मी.), वेअर हाउस पक्का परिसर (४९९० चौ.मी.), प्रशासकीय इमारत, कस्टम कार्यालय (सुमारे २११.३चौ.मी.), ऑफिस कंटेनर २, कंटेनर यार्ड (पक्का परिसर,सुमारे १२४१४ चौ.मी.)
सार्वजनिक सुविधेसाठी एक ब्लॉक, खासगी मालवाहतूक टर्मिनल, दोन हँडलिंग लाइन, एक रिव्हर्सल लाइन, रेल्वे लेव्हल प्लॅटफॉर्मसह ०.३ एमएल भूमिगत पंप, पंप रूम (पाणी साठवण) पंपिंग सुविधा, ट्रक पार्किंग (३११४ चौ.मी.)
खुला स्टील यार्ड (४५०० चौ.मी.),अंतर्गत रस्ते व वाहतूक क्षेत्र
विद्युत सुविधा (हायमास्ट, स्ट्रीट लाइट, अंतर्गत प्रकाश व्यवस्था) आदी
सुविधा या पहिल्या फेजमध्ये उभारण्यात आल्या आहेत.
जालना जिल्हा हा स्टील, बियाणे उद्योगासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथून स्टील, लोखंड, कच्चा माल, स्पंज आयर्न, तयार उत्पादने, टाइल्स व सिमेंट पाइप, खते, कीटकनाशके आदी उत्पादनांची निर्यात करणे शक्य होणार आहे. विविध पेय, मद्य व व्हिनेगर, वाहने व सुटे भाग, कापूसगाठी, खाद्य तेल, सोया मिल, डी-ऑइल्ड केक, कृषी उत्पादने (सोयाबीन, मका, तूर, डाळी, हरभरा), जिल्ह्यातील प्रसिद्ध मोसंबी, आंबा, द्राक्षे, साखर, हिंगोलीची हळद, मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील वस्तूंसह विदर्भातील लोखंडाचा कच्चा माल, तांदूळ, नागपूरची संत्री आदी निर्यात केल्या जातील.
ड्रायपोर्टसाठी प्रमुख उद्योगांची ठिकाणेजालना औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी
जालना एमआयडीसी फेज -३,
शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र
ऑरिक (एयूआरआयसी) सिटी, शेंद्रा
ऑरिक सिटी, बिडकीन
जालना, बीड, नांदेड, अकोला औद्योगिक क्षेत्र