So Cute: विराट कोहलीचा अकाय किती मोठा झाला आहे! बाबासोबत लंडनच्या रस्त्यांवर दुडूदुडू चालताना दिसला Video
esakal March 03, 2026 04:45 PM

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीकडे सध्या वनडे मालिका नसल्याने मोकळा वेळ आहे. यादरम्यान तो लंडनमध्ये त्याच्या कुटुंबासमवेत आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो त्याच्या मुलासोबत फिरताना दिसत आहे.

Virat Kohli and Aayush Patil : भिंतीवरील फोटो ते प्रत्यक्ष भेट; कऱ्हाडच्या आयुष पाटीलची कोहलीसोबत भेट

विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही वर्षांपासून कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक झाला आहे. पण असे असले तरी तो बऱ्याचदा भारतात येत असतो. काही दिवसांपूर्वीच तो आणि अनुष्का भारतात होते. पण आता ते पुन्हा लंडनमध्ये परतले आहेत. त्यामुळे सध्या विराट त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.

३७ वर्षीय विराट लंडनमध्ये त्याचा दोन वर्षाचा मुलगा अकायसोबत (Akaay) लंडनच्या रस्त्यांवर (London Streets) फिरताना दिसला होता. यावेळी अकाय त्याचे बोट धरून चालत होता, त्यावेळी तेथील काही स्थानिकांशी बोलताना दिसला. यावेळी तो प्रेमाणे अकायच्या डोक्यावर हात फिरवतानाही दिसला होता. या क्षणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) झाला आहे.

या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी 'खूप क्यूट' व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी म्हटले आहे की अकाय किती लवकर मोठा झाला आहे. तर काहिंनी तेथील लोक विराटला रस्त्यांवर फिरताना सेल्फी किंवा ऑटोग्राफसाठी त्रास देत नसल्याकडेही लक्ष वेधले आहे.

दरम्यान, अकायचा जन्म १५ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला. विराटची पत्नी अनुष्काने अकायला लंडनमध्ये जन्म दिला होता. विराट आणि अनुष्का यांना याआधी २०२१ मध्ये कन्यारत्नही प्राप्त झाले होते, जिचे नाव त्यांनी वामिका ठेवले आहे.

तथापि, विराट आणि अनुष्काने अद्याप त्यांच्या मुलांचा चेहरा जगाला दाखवलेला नाही. त्यांनी यापूर्वीच सर्वांना त्यांच्या खाजगी आयुष्याचा आदर करावा याची विनंतीही केली आहे. त्यामुळे अनेकदा जेव्हा त्यांच्या कुटुंबाचे व्हिडिओ व्हायरल होतात, तेव्हा त्यांच्या मुलांचा चेहरा लपवण्यात येतो.

अजित आगरकरचे धक्कातंत्र! Virat Kohli, रोहित शर्मा यांना बसणार मोठा फटका, BCCI कडे पाठवलाय प्रस्ताव, आता... विराट आता आयपीएलमध्ये दिसणार

विराटने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे प्रकारामध्ये खेळताना दिसतो. तसेच आयपीएलमध्येही तो सक्रिय आहे.

त्यामुळे आता विराट भारताकडून ऑगस्टमध्ये खेळताना दिसेल. मात्र, त्याआधी तो मार्चच्या अखेरीस सुरू होणाऱ्या आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसेल. तो सलग १९ व्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दिसेल. तो सलग १९ वर्षे एकाच संघाकडून आयपीएल खेळणारा एकमेव खेळाडू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.