लासलगाव: ग्रामपंचायत कार्यालयाजवळील टर्फ क्रिकेट मैदानावर रविवारी (ता. १) सायंकाळी झालेल्या वादातून तरुणावर हल्ला झाला. आपसांत भांडण करणाऱ्या मुलांना समजावण्यासाठी गेलेल्या धीरज मनोज परेराव (वय २२, रा. लासलगाव) याला संशयितांनी दगड व सिमेंटच्या गट्ट्याने मारहाण केली.
रविवारी सायंकाळी पावणेआठला टर्फ मैदानावर काही मुलांमध्ये हाणामारी सुरू होती. ती सोडविण्यासाठी धिरज परेराव तेथे गेले असता, संशयित टग्या ऊर्फ इरफान मनियार व राज शेख याच्यासह २० ते २५ जणांनी शिवीगाळ करत सिमेंटचा गट्टू धीरजच्या पाठीत मारला. तसेच राज शेख याने धीरजला दगड मारला. यात धीरज गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात हलविण्यात आले.
Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणारपोलिसांनी संशयित राज मोहमद्द शेख, नदिम रहमान शेख, इरफान उर्फ टग्या बाबूलाल मनियार, रेहान मोहमद्द शेख, अजगर मकबुल शेख यांना अटक केली असून, त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात असता आले. त्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तीन विधिसंघर्षित बालकांना बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.
रविवारच्या घटनेनंतर सोमवारी (ता. २) जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीला निफाडचे पोलिस उपअधीक्षक कांतिलाल पाटील, दीपक पाटील, लासलगावचे माजी सरपंच जयदत्त होळकर, राजेंद्र चाफेकर, प्रकाश पाटील उपस्थित होते.