Full schedule of Indian cricket team after T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध हा सामना होणार आहे आणि त्यानंतर ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना होईल. यानंतर भारतीय खेळाडू काही दिवसांच्या विश्रांतीवर जातील आणि त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. पण, भारतीय खेळाडू पुन्हा एकदा निळ्या जर्सीत एकत्रित कधी खेळताना दिसणार आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) कालच अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. या दौऱ्यावर अफगाणिस्तान एक कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. जूनमध्ये होणाऱ्या या मालिकेतून रोहित शर्मा व विराट कोहली हे पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहेत. जानेवारी २०२६ नंतर दोन्ही दिग्गज टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे सर्वांना या वन डे मालिकेची उत्सुकता आहे. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे.
Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य Afghanistan tour of India schedule६ ते १० जून - एकमेव कसोटी, न्यू चंदिगढ
१४ जून - पहिली वन डे - धर्मशाला
१७ जून - दुसरी वन डे - लखनौ
२० जून - तिसरी वन डे - चेन्नई
१ जुलै - पहिली ट्वेंटी-२० - चेस्टर ले स्ट्रीट
४ जुलै - दुसरी ट्वेंटी-२० - मँचेस्टर
७ जुलै - तिसरी ट्वेंटी-२० - नॉटिंगहॅम
९ जुलै - चौथी ट्वेंटी-२० - ब्रिस्टॉल
११ जुलै - पाचवी ट्वेंटी-२० - साऊथहॅम्पट
१४ जुलै - पहिली वन डे - बर्मिंगहॅम
१६ जुलै - दुसरी वन डे - कार्डीफ
१९ जुलै - तिसरी वन डे - लंडन
२ कसोटी सामने वि. श्रीलंका ( अवे)
३ ट्वेंटी-२० वि. अफगाणिस्तान ( अवे)
आशियाई स्पर्धा
३ वन डे वि. वेस्ट इंडिज ( होम)
५ ट्वेंटी-२० वि. वेस्ट इंडिज ( होम)
२ कसोटी वि. न्यूझीलंड ( अवे)
३ वन डे वि. न्यूझीलंड ( अवे)
५ ट्वेंटी-२० वि. न्यूझीलंड ( अवे )
३ वन डे वि. श्रीलंका ( होम)
५ ट्वेंटी-२० वि. श्रीलंका ( होम)