SA vs NZ SF Toss : न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेज करण्याचा निर्णय, दोन्ही संघांकडून बदल
GH News March 04, 2026 10:12 PM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 52 सामन्यानंतर उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले. यंदा गतविजेता इंडिया, गतउपविजेता दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड या 4 संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात आज 4 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार मिचेल सँटनर याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेज करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायक सामन्यासाठी दोन्ही संघांकडून बदल करण्यात आले आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडून 3 बदल

न्यूझीलंडचा मॅचविनर गोलंदाज मॅट हेन्री स्पर्धेदरम्यान मायदेशातून परतला आगहे. तर प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल करण्यात आला आहे.ईश सोढी याच्या जागी जेम्स निशाम याचा समावेश करण्यात आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने तब्बल प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. मार्को यान्सेन, डेव्ही़ड मिलर आणि कगिसो रबाडा या तिघांचं कमबॅक झालं आहे. या तिघांना सुपर 8 मधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध विश्रांती देण्यात आली होती.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन लन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स निशम, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडेन मार्कराम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी एनगिडी.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.