Who will New Zealand face in T20 World Cup final India or England? न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले. स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ असलेला आफ्रिकेचा संघ मोक्याच्या सामन्यात पुन्हा एकदा 'चोकर्स' ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडचा हा आफ्रिकेवरील पहिलाच विजय ठरला, यापूर्वी पाच सामन्यांत आफ्रिकेने बाजी मारली होती. पण, आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीचा इतिहास पाहिला, तर न्यूझीलंडने बाद फेरीत आफ्रिकेला नेहमी पराभूत केले आहे. तिच परंपरा आजही कायम राखताना न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्यासमोर भारत किंवा इंग्लंड यांच्यातल्या विजेत्याचे आव्हान असणार आहे.
दक्षिण आफ्रिका आयसीसी स्पर्धेत पुन्हा एकदा 'चोकर्स' असल्याचे दिसले... एडन मार्करम ( १८) च्या विकेटवरून वाद सुरू असला तरी आज आफ्रिकेचे सलामीवीर अपयशी ठरले. कोल मॅकोंचीने दुसऱ्याच षटकात सलग दोन चेंडूंवर क्विंटन डी कॉक ( १०) व रायन रिकेल्टन ( ०) यांना बाद केले. त्यानंतर रचिन रविंद्रने मोठा दिला. मार्करम झेलबाद झाला. डेव्हिड मिलरलाही ( ६) त्याने शांत ठेवले. किवींकडून दोन झेल सुटले,परंतु त्याचा फार मोठा फटका त्यांना बसला नाही.
T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Videoआफ्रिकेचे ५ फलंदाज ७७ धावांवर माघारी परतल्यानंतर त्याचं काही खरं नाही, असेच वाटत होते. पण, त्रिस्तान स्तब्स व मार्को यान्सेन ही जोडी उभी राहिली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. तत्पूर्वी डेवॉल्ड ब्रेव्हिसने ३४ धावांची खेळी केली होती. ब्रेव्हिस २९ धावांवर माघारी परतला अन् पुन्हा न्यूझीलंडने पुनरागमन केले. यान्सेनने ३० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५५ धावांची नाबाद खेळी केली. त्याने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील ही पाचवी आणि आफ्रिकेकडून दुसरी वेगवान फिफ्टी ठरली.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या बाद फेरीत सातव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक करणारा मार्को दुसरा फलंदाज ठरला. यान्सेनच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेने ८ बाद १६९ धावांपर्यंत मजल मारली. कोल मॅकोंची ( दुसऱ्या षटकात) व मॅट हेन्री ( २०व्या षटकात) यांनी हॅटट्रिकची संधी निर्माण केली होती, परंतु दोघांनाही अपयश आले. किवींकडून रचिन रविंद्रनेही दोन विकेट्स घेतल्या. फिन अॅलन व टीम सेइफर्ट यांनी न्यूझीलंडला आक्रमक सुरूवात करून देताना ४.१ षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या.
T20 World Cup : मोदीजी 'अपशकुनी'! ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये नको, मुंबईत खेळवा...; कोणी केलंय हे वादग्रस्त विधान?सेइफर्ट व अॅलन जोडीने ७.५ षटकांत शंभर धावा फलकावर चढवल्या. सेइफर्टने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आफ्रिकेच्या खेळाडूंनी पराभव मान्य केल्याचे दिसले. त्यांची देहबोली तशी दिसच होती आणि त्यामुळेच त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणात चूका झाल्या. ११७ धावांवर न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. सेइफर्ट ३३ चेंडूंत ७ चौकार व २ षटकांत ५८ धावांवर कागिसो रबाडाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. अॅलन मैदानावर उभा राहिला आणि संघाला १२.५ व्या षटकांत विजय मिळवून दिला. अॅलनने ३३ चेंडूंत १० चौकार व ८ षटकारांसह १०० धावांची नाबाद खेळी केली, रचिन रविंद्र १३ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडने ९ विकेट्स राखून विजय मिळवला. अॅलनने वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक झळकावले.