मुलुंडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
मुलुंड (बातमीदार) : मुलुंड येथील सुमती या सेवाभावी संस्थेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवारी (ता. २२) सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६ या कालावधीत मुलुंड पूर्वेतील मराठा मंडळ हॉल, ९० फूट रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे रक्तपेढ्यांना गंभीर टंचाईचा सामना करावा लागत आहे. याच अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले असून सर्व सहभागींना अल्पोपाहार, देणगीदारांचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेदेखील आयोजकांनी सांगितले आहे.