12,000 विद्यार्थ्यांसमोर 'भूत बंगला'चे दणदणीत प्रमोशन; अक्षय कुमार-वामिका गब्बींची एरियल एंट्री पाहून चाहते थक्क
esakal March 05, 2026 02:45 PM

Entertainment News : १४ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर, बॉलिवूडमधील सर्वांची आवडती अभिनेता-दिग्दर्शक जोडी अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ‘भूत बंगला’साठी पुन्हा एकत्र आली आहे. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला काही आयकॉनिक कॉमेडी चित्रपट देणारी ही जोडी यावेळी हॉरर-कॉमेडीसह परतत आहे.

भीती आणि विनोदाचा समतोल साधणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भन्नाट अनुभव देणार आहे. Balaji Motion Picturesच्या पाठिंब्याने तयार होत असलेला हा सिनेमा त्यांच्या खास विनोदशैली, अप्रतिम कॉमिक टाइमिंग आणि पूर्वीच्या सहकार्यांना ‘कल्ट क्लासिक’ बनवणाऱ्या मनोरंजनाची आठवण करून देणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अक्षय कुमार आपल्या सहकलाकार वामिका गब्बीसोबत एका कॉलेज कॅम्पसमध्ये प्रमोशनसाठी पोहोचले. या कार्यक्रमाला तब्बल १०,००० ते १२,००० विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती. संपूर्ण परिसरात उत्साह, जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट घुमत होता. दोघांनी एरियल सेटअपद्वारे आकाशातून भव्य एंट्री घेतली आणि ‘राम जी आके भला करेंगे’ या जोशपूर्ण गाण्यावर ही एंट्री अधिकच रंगतदार ठरली.

View this post on Instagram