Arjun Tendulkar and Sania Chandok grand wedding ceremony in Mumbai: तेंडुलकर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जून तेंडुलकर विवाह बंधनात अडकला. सानिया चंडोकसोबत त्यानं साताजन्माची गाठ बांधली. हा भव्य विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथे पार पडला. या लग्नसोहळ्यात खास दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिडा विश्वातील दिग्गज, उद्योगपती आणि नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून अर्जून आणि सानियाच्या विवाहसोहळ्यातील विधींना सुरुवात झाली होती. हळदी समारंभ आणि मेहंदी समारंभ अगदी थाटात पार पडला. या सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, या विवाह सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा ग्रँड लग्न सोहळा पार पडला. सकाळी पावणे बाराच्या दरम्यान, हा सोहळा पार पडला असल्याची माहिती आहे. या खासदिनी सानिया चंडोकने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात सानिया चंडोक अगदी सुरेख दिसत होती. तर, अर्जून तेंडुलकरनेही पारंपारिक पोशाख परिधान केला होता. या लग्नसोहळ्यात अनेक दिग्गज मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली.
View this post on Instagram
वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये खेळाडूंपासून नेते मंडळींनी हजेरी लावली. या लग्न सोहळ्यात, अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे, अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे, सुनील गावस्कर, शंकर महादेवन, फरहान अख्तर, युवराज सिंह, शायना एनसी, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी, आशिष नेहरा, श्रेयस अय्यर, इरफान पठाण उपस्थित होते. या सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळींनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या.