28538
उमाळ्याच्या कुशीत शिडवणे शाळेचा आनंदमेळा
वनभोजन उत्साहात; निसर्ग, मैत्री आणि आनंदाचा संगम
तळेरे, ता.४ : निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारत, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन मैत्री आणि सहकार्याची भावना जोपासण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ चा वनभोजन उपक्रम नाधवडे उमाळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी उत्साहात पार पडला. या सहलीमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. निसर्गरम्य परिसरात सर्वांनी मिळून वनभोजनाचा आस्वाद घेतला. या उपक्रमासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांचे सहकार्य लाभले. दिवसभर चाललेल्या या सहलीत विद्यार्थ्यांनी निसर्ग भ्रमंतीसोबतच गाणी, गप्पा आणि खेळांची मजा घेतली. सायंकाळी आनंदी वातावरणात या उपक्रमाची सांगता झाली.