राज्यसभा निवडणूक 2026: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election 2026) पार्श्वभूमीवर आमदार, खासदार आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच ही बैठक बोलावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करायचा की दुसरा उमेदवारही रिंगणात उतरवायचा, यावर सखोल चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या जागेवर बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र, संख्याबळ आणि इतर पक्षांची भूमिका लक्षात घेता दुसरा उमेदवार देण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. बैठकीतील अंतिम निर्णयानंतरच पुढील रणनीती जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, तातडीच्या घडामोडीत पक्षाकडून सोलापूरच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांचाच उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या चेहऱ्याला संधी देत शिंदे यांनी सामाजिक आणि राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
दुसऱ्या संभाव्य उमेदवाराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. या जागेसाठी रोहित टिळक (Rohit Tilak) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अंतिम निर्णय बैठकीनंतरच घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महाविकास आघाडीकडून शरद पवार रिंगणात असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाचा पुढील निर्णय निर्णायक ठरणार आहे. एकूणच, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीची ही बैठक राज्यसभेच्या समीकरणांना कलाटणी देणारी ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष शिंदे यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)
5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी
कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित? (Rajyasabha Election 2026)
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)
शिवसेना : 56
राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)
महायुती : 52 अतिरिक्त मते
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त…म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.
उबाथा: २०
शरद पवार : १०
काँग्रेस : 16
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)
आणखी वाचा
आणखी वाचा