Bigg Boss Marathi Session 6: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात येणारा कॅप्टन्सी टास्क (Captaincy Task) यावेळी मोठं नाट्य घेऊन येणार असल्याचं नव्या प्रोमोमधून दिसत आहे. चॅनेलने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये स्पर्धक कॅप्टन्सीच्या शर्यतीत स्थान मिळवण्यासाठी दोऱ्यांशी संबंधित एका कठीण टास्कमध्ये झुंज देताना दिसतात.
टास्कदरम्यान घरातील सदस्य अनेक दोऱ्या खेचत आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या दरम्यान संकेतही जोरदारपणे दोऱ्या खेचताना दिसतो. काही क्षणांसाठी टास्क खूपच तीव्र झालेला दिसतो आणि स्पर्धकांमध्ये जोरदार झुंज सुरू असल्याचं जाणवतं. मात्र पुढच्याच क्षणी परिस्थिती अचानक बदलते. संकेत अनेक दोऱ्यांमध्ये अडकलेला दिसतो आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करत असताना घरात गोंधळाचे वातावरण निर्माण होतं.

या वेळी राखी घाबरलेल्या आवाजात ओरडताना ऐकू येते, "त्याच्या गळ्यात दोरी अडकलीय!", त्यामुळे घरातील इतर सदस्यही चिंतेत पडलेले दिसतात. याच दरम्यान बिग बॉसचा आवाजही ऐकू येतो - "थांबा… सगळ्यांनी त्वरित थांबा!" आणि टास्क लगेच थांबवण्यास सांगितलं जातं. त्यानंतर घरातील सदस्य संकेतला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. राखी ओरडते, संकेत बेशुद्ध झाल्यासारखा दिसतोय, असंही म्हणताना ऐकू येते. त्यामुळे पुढे नेमकं काय घडलं आणि या कॅप्टन्सी टास्कचा पुढे काय परिणाम होणार? याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धकांनी पन्नास दिवस सुरू केला आहे. यामध्ये घरात मोठा ट्वीस्ट आल्याचं पाहायला मिळतंय. घरात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झालीय. त्यामुळे आधीपासूनच घरात असलेल्या स्पर्धकांचं टेन्शन वाढलं आहे. आधीच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या राखी सावंतनं पहिल्या दिवसापासून घरात असलेल्या साऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यात आणखी तीन स्पर्धकांची एन्ट्री झाल्यामुळे सारेच धास्तावले आहेत. अशातच आता घरात नवी समीकरण पाहायला मिळणार हे नक्कीच.