Shreya Ghoshal: श्रेया घोषाल ही बॉलीवूडची आघाडीची गायिका आहे. अनेक हिंदी, मराठी गाण्यांनी ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध तिन केलंय. श्रेयाच्या आवाजातील गाणं म्हटलं की ते हिट झालंचं समजा एवढी क्षमता आणि विश्वास सगळ्या निर्मात्यांचा, चाहत्यांचा असतो. अनेक अशी गाणी आहेत जी केवळ श्रेया घोषालच्या आवाजामुळे लोकप्रिय झालीयेत. यापैकीच एक गाणं म्हणजे चिकणी चमेली. पण श्रेया घोषालने हे गाणं आता पुन्हा कधीच गाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. असं का म्हणाली श्रेया? पाहूयात..अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेयाने तिने निवडलेल्या कामांबद्दल, तिच्यावर झालेल्या टीकेवर आणि ट्रोलिंगवर ती बोललीय.
राज शामानीला श्रेया घोषालने अलीकडेच एक मुलाखत दिली. त्यावेळी चिकनी चमेली गाण्यासाठी तू ट्रोल झाली होतीस त्यावेळी काही वादग्रस्त बोलली होतीस का? असं तिला विचारण्यात आलं. त्यावेळी श्रेया म्हणाली," मी ट्रोल झाले होते? मलाच माहित नाही. मी मनापासून सांगितलं होतं. ट्रोल झाले असं काही नसेल. मी वादग्रस्त काही बोलले नव्हते. मी म्हणाले होते की लहान मुलांसमोर गाणं गाऊ शकत नाही. ते मला योग्य वाटत नाही. मला योग्य नाही वाटलं. चिकनी चमेली फार अश्लील वगैरे असं काही नव्हतं असं श्रेया म्हणाली.
ती पुढे म्हणाली,श्रेया पुढे म्हणाली," चिकनी चमेलीनंतर तशाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक उच्चार न करता येणाऱ्या किंवा संकोच वाटेल असे शब्द असणाऱ्या गाण्यांसाठी मला विचारणा झाली. पण मी तेव्हा स्पष्टपणे त्या गाड्यांना नकार दिला होता. चिकणी चमेली या गाण्याने मला खूप लोकप्रियता मिळाली. ते गाणं खरंतर खूप वेगळं होतं. खरंतर तेव्हा मला तितकी कळतही नव्हतं की त्याचा अर्थ काय आहे, पण आता मी विचारपूर्वक निर्णय घेते. असं श्रेयाने म्हटलं.
अशी कितीतरी गाणी आहेत जी मी नाकारली पण नंतर ती सुपरहिट झाली. या सगळ्याचा आता मी खूप कमी विचार करते. मला आताचे योग्य वाटतं तेच मी करते. वर्षभराचा प्लॅन करत नाही. माझं सध्या वेळापत्रक व्यस्त असल्याने काही वेळेला हे करावं लागतं. असेही श्रेया घोषाल म्हणाली.