YSH26B05110
अकलूज (ता. माळशिरस) : आनंदी लिनेस क्लबतर्फे आयोजित शिबिरास उपस्थित मान्यवर.
---
आनंदी लिनेस क्लबतर्फे
कर्करोग जनजागृती शिबिर
सकाळ वृत्तसेवा
अकलूज, ता. ५ : येथील आनंदी लिनेस क्लबच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून कर्करोग जनजागृती शिबिर राबविण्यात आले. या शिबिरास महिलांची उपस्थिती मोठी होती.
करोळे (ता. पंढरपूर) येथे आयोजित शिबिरात गर्भाशय व छातीच्या कर्करोगाबाबत डॉ. छाया दगडे यांनी मार्गदर्शन करून त्याची लक्षणे, त्यावर घ्यावयाची काळजी व त्यासाठी लागणाऱ्या टेस्ट या संदर्भातील माहिती दिली.
यावेळी क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट छाया बुराडे व क्लबच्या अध्यक्षा राजश्री जगताप यांच्या सहकार्यामुळे ज्या गावात जायला रस्ताही नाही अशा अतिशय ग्रामीण भागात शिबिर घेण्यात आल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. यावेळी राजश्री जगताप यांनी सॅनिटरी पॅडचे वाटप करून स्वच्छतेचा संदेश दिला. छाया बुराडे यांनी महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले.
महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आनंदी लिनेस क्लब पुढील काळात वेगवेगळे उपक्रम राबवेल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. यामध्ये सरपंच नंदा शिंगटे व सविता शिंगटे तसेच आशा वर्कर साठे, परिचारिका शिरसाट यांनी सहकार्य करीत महिलांच्या कोणत्याही शिबिरासाठी मोलाचे सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. राजश्री जगताप यांनी आभार मानले.