मुळशीत काॅंग्रेसकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
esakal March 07, 2026 07:45 AM

कोळवण, ता. ६ ः मुळशी तालुका काॅंग्रेस पक्षाच्या वतीने तालुक्यात पक्ष संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पौड येथील कार्यालयात झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत पुणे जिल्हा काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष सुरेश पारखी यांनी नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्तीची पत्र दिली आहेत.
या बैठकीत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचे सत्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, किसान काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर सातव, तालुकाध्यक्ष सुरेश पारखी, रमेश पानसरे, कविता दातीर, एकनाथ खोले, संतोष चांदेरे, अशोक मातेरे, प्रदीप जाधव, महेश मोहोळ, नारायण साठे आदी उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकारी ः कार्याध्यक्ष सोमनाथ मातेरे, उपाध्यक्ष काशिनाथ दातीर, किसान काॅंग्रेस अध्यक्ष चंद्रकांत लामखडे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.