Maharashtra Budget 2026, Nashik Kumbh Mela : आता त्र्यंबकेश्वरला मिळणार 'अमृतस्नान'! फडणवीसांच्या बजेटमध्ये नाशिक कुंभमेळ्यासाठी काय आहे खास? पाहा सविस्तर...
esakal March 07, 2026 09:45 AM

Nashik Kumbh Mela infrastructure development plan : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. ६) विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि सामाजिक समतेवर विशेष भर देण्यात आला आहे. विशेषतः कुंभमेळा (Kumbh Mela) आयोजनासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिक कुंभमेळ्यासाठी एकात्मिक विकास आराखडा

नाशिक (Nashik) येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. या अंतर्गत गोदावरी नदी (Godavari River) स्वच्छता, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे उपसा योजनेद्वारे अमृतस्नान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घाटांचे सुशोभीकरण तसेच शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. याशिवाय नाशिक रिंग रोड, रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांच्या श्रेणीवर्धनाची कामेही पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शिवकालीन वारशासाठी विशेष तरतूद

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या युनेस्को यादीतील १२ किल्ल्यांच्या वारसा जतनासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच राजकोट किल्ला (Rajkot Fort) परिसर विकास, आग्रा (Agra) येथे शिवाजी महाराजांचे स्मारक आणि पानिपत (Panipat) येथील काला अंब येथे मराठा शौर्य स्मारकासाठी सहाय्य देण्यात येणार आहे.

वासोटा किल्ला (Vasota Fort) येथे मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेण्यात येणार असून साताऱ्यातील अंजिक्यतारा किल्ला (Ajinkyatara Fort) आणि संगम माहुली (Sangam Mahuli) येथे असलेल्या महाराणी ताराबाई व Chhatrapati Shahu Maharaj यांच्या समाधीस्थळांचे जतन व जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

संभाजी महाराज स्मारकांचे काम पूर्णत्वाकडे

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या Tulapur येथील स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत, तर Vadhu Budruk येथील समाधीस्थळाचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच संगमेश्वर (Sangameshwar) येथील स्मारकाचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

महात्मा फुले जयंती वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम

महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त (११ एप्रिल २०२६) विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. त्यांच्या जन्मगाव Katgun येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जन्मगाव नायगांव (Naigaon) येथे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली.

सामाजिक समता आणि समरसता वर्ष

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर (B. R. Ambedkar) यांच्या महाड (Mahad Satyagraha) शताब्दी वर्षानिमित्त महाड व चवदार तळे परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. तसेच संत गाडगे बाबा (Sant Gadge Baba) यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान यांना जोडणारे संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येणार आहे. महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

  • धार्मिक व पर्यटन विकासाला चालना

  • जगद्गुरु तुकाराम महाराज (Jagadguru Tukaram Maharaj) यांच्या Dehu येथील जन्मस्थान व जीर्ण घराचे जतन करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.

  • याशिवाय, राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासाची कामे सुरू आहे. पंढरपूर (Pandharpur) मंदिर विकास आराखड्यातील पुढील टप्प्यांची अंमलबजावणी

  • Maharashtra Tourism Development Corporation (एमटीडीसी) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५० पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधा उभारणी

  • Navargaon आणि Ramtek येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करण्याचा निर्णय

  • महाकवी कालीदास (Kalidasa) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती

अनुवाद अकादमीची स्थापना

मराठी साहित्याचा प्रसार वाढवण्यासाठी ‘Yashwantrao Chavan Maharashtra Translation Academy’ स्थापन करण्यात येणार असून मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये तसेच इतर भाषांतील उत्कृष्ट साहित्य मराठीत अनुवादित करण्याची योजना राबवली जाणार आहे. या अर्थसंकल्पातून धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक वारसा जतन आणि सामाजिक समतेच्या उपक्रमांना मोठे प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.