कोल्हापूर : जिल्ह्यात तीन वर्षांत ऊस फड जळण्याच्या सुमारे २५० हून अधिक घटना घडल्या असून, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा ऊस जळून खाक झाला आहे. विद्युत निरीक्षक विभागाने महावितरणच्या तारांमधून झालेल्या वीज गळतीमुळे आग लागल्याचा अहवाल दिला.
अशा सर्व प्रकरणांचे प्रस्ताव महावितरणकडे पाठविले. मात्र, अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांमध्ये ऊस जळिताच्या घटना घडल्या आहेत.
Kolhapur Electicity Shock : निष्काळजीपणाचा फटका; विजेच्या धक्क्याने वर्षभरात ४१ कुटुंबे उद्ध्वस्त! महावितरण, नागरिक-शेतकऱ्यांचे दुर्लक्ष बेतले जीवावरया घटनांपैकी सुमारे ६० टक्क्यांहून अधिक प्रकरणांत महावितरणच्या विद्युत तारांमधील ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या यंत्रणेमुळे नुकसान झाल्यास भरपाई देण्याची तरतूद असली, तरी प्रत्यक्षात ती मिळविण्याच्या अटी शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत आहेत.
शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव महावितरणकडे दिले. दोन वर्षे इरिगेशन फेडरेशननेही संघटित पातळीवर पाठपुरावा केला; मात्र मोजक्या शेतकऱ्यांचा अपवाद वगळता बहुतांशांना भरपाई मिळालेली नाही, असे फेडरेशनचे निमंत्रक विक्रांत पाटील यांनी सांगितले.
Mahavitaran: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटी लाईनमनचा मृत्यू; परिसरात संतापाची लाट असाही विरोधाभासशेतकरी सांगतात की, वीज ग्राहकाने महावितरणचे बिल एक-दोन महिने थकीत ठेवले, तर वारंवार संदेश पाठवूनही बिल भरले नाही, तर थेट लाईनमनमार्फत वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, उलट परिस्थितीत महावितरणकडून ग्राहकांना देय असलेली भरपाई देताना महिनोन्महिने किंवा वर्षानुवर्षे विलंब होत असल्याचे चित्र आहे.
जाचक अटींचा बोजाऊस शेती जळाल्यानंतर शेतकऱ्यांना पंचनामा, विद्युत निरीक्षकांचा अहवाल, कृषी अधिकारी, तलाठी, तहसीलदार यांचे अहवाल, साखर कारखान्याचा अहवाल, सातबारा उतारा, पीक नोंदी, अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. संबंधित घटनेत विद्युत निरीक्षकांच्या अहवालात महावितरणच्या यंत्रणेमुळे आग लागल्याचे स्पष्ट नमूद असणे आवश्यक असते.
एखाद्या शेतकऱ्याला इतक्या विविध विभागांकडे जाऊन कागदपत्रे गोळा करणे, त्यानंतर प्रस्ताव सादर करून मंजुरीसाठी सतत पाठपुरावा करणे त्रासदायक अनुभव ठरतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी काही टप्प्यानंतर पाठपुरावा सोडून दिल्याचा अनुभव आहे.
वर्षभरात जळिताच्या एकूण १३७ घटना घडल्या. त्यापैकी ३५ प्रकरणे सर्व कागदपत्रांसह महावितरणकडे आली. ही प्रकरणे तपासून भरपाईसाठी मुख्यालयाकडे पाठविली असून, त्यातील १२ प्रकरणांमध्ये भरपाई दिली आहे.
- गणपत लटपटे, अधीक्षक अभियंता, महावितरण
विद्युत अपघात व जळीत प्रकरणांत महावितरणकडून नुकसानभरपाई दिली जाते. मात्र, विद्युत निरीक्षकांच्या अहवालात महावितरणच्या यंत्रणेमधील बिघाडामुळे आग लागल्याचे स्पष्ट असणे आवश्यक आहे. अनेक वेळा सर्वसाधारण जळिताच्या घटनांमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा दावा केला जातो; परंतु प्रत्यक्षात इतर कारणांनी आग लागलेली असू शकते. त्यामुळे नियमानुसार प्रस्ताव आल्यासच भरपाई देणे शक्य होते.
- स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण कोल्हापूर, परिमंडळ