IND vs NZ Final : कॅप्टन सूर्याची प्लेइंग ईलेव्हनबाबत अशी प्रतिक्रिया, म्हणाला, सर्व आजच..
GH News March 07, 2026 11:15 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीचा विजेता कोण ठरणार हे येत्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. या स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडसमोर गतविजेत्या आणि यजमान टीम इंडियाचं आव्हान असणार आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर करो या मरो सामन्यात मात करत सेमी फायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर भारताने इंग्लंडवर विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे आता न्यूझीलंड पहिलाच टी 20i वर्ल्ड कप जिंकणार की टीम इंडिया तिसरी ट्रॉफी मिळवणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे.

आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामन्याआधी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याबाबत उत्सूकता पाहायला मिळाली. हीच उत्सूकता अंतिम सामन्यासाठीही कायम आहे. टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळे अभिषेकला संधी मिळणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. अशात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेला संबोधित केलं. सूर्याला या दरम्यान प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्न करण्यात आला. सूर्याने यावर काय उत्तर दिलं? हे जाणून घेऊयात.

कॅप्टन सूर्यकुमार यादव काय म्हणाला?

सूर्याने पत्रकाराने प्लेइंग ईलेव्हनबाबत विचारलेल्या प्रश्नावर थोडक्यात भाष्य केलं आणि विषय संपवला. सूर्याने उत्तर देताना प्लेइंग ईलेव्हनबाबत काहीच स्पष्टपणे सांगितलं नाही. सूर्याने प्लेइंग ईलेव्हन कशी असेल हे सामन्याच्या दिवशीच समजेल, असं सूर्याने म्हटलं.

“बदल उद्या पाहा. तुम्हाला सर्वच आजच जाणून घ्यायचंय”, असं गंमतीत म्हणून सूर्याने प्लेइंग ईलेव्हनचा विषय संपवला. सूर्याच्या या अशा प्रतिक्रियेमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

फायनलसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.