शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
वैभव बोडके March 08, 2026 01:43 AM

Satara News :   सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. शेतात पाईपलाईनचे काम करताना दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून या दोघांचा मृत्यू झाला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे इथं ही दुर्दैवी घटना घडली आहे.  

कराड तालुक्यातील उंडाळे मनव मार्गांवर दक्षिण मांड नदीच्या शेजारी संगम शिवारात शेतातील पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करण बाजीराव चव्हाण व अमर रंगराव वडार असे मृत्यू झालेल्या मजुरांचे नाव आहे. दोघेही मनव गावचे रहिवासी असून श्रीरंग पाटील यांच्या शेतात पाईपलाईन टाकण्याचे काम करत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. दोन्ही मुजरांचे मृतदेह उंडाळे ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.