मार्ग खुला झाल्यानंतर कतार भारताला एलएनजी पुरवठा सुरू करणार आहे - सरकारी सूत्र
क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या८ मार्च २०२६ रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम रेल्वे क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या चालवत आहे.
CBSE postpones: सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याइराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व देशांमध्ये ९-११ मार्च दरम्यान होणाऱ्या सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स आणि यूएव्ही सुविधेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती लावलीवांद्रे कुर्ला संकुलात (BKC) भूखंडासाठी एमएमआरडीएकडे बीएसईची विचारणा
बीएसईचे एमडी व सीईओ सुंदररामन राममूर्ती यांची एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्याशी भेट
मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह विस्तारावर सविस्तर चर्चा
एनएसईने बीकेसीमध्ये नुकताच विस्तार केल्यानंतर बीएसईचीही पावले
कन्नडच्या रस्ते आणि पुलासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर- आ. संजना जाधवकन्नडः तालुक्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटी आणि नाबार्डअंतर्गत पुलांच्या कामांसाठी ६ कोटी ७९ लाख, असा एकूण सुमारे एकुन ३१ कोटी ७९ लाख रुपयाच्या निधीला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती शनिवारी (ता.७) रोजी प्राप्त झाली. तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या खडीकरण, रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी अर्थसंकल्पातून २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात प्रामुख्याने साखरेवल ते करंजखेडा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १०.५ कोटींची तरतूद आहे. याशिवाय अंबा-वडनेर-कोळवाडी मार्गासाठी ३ कोटी, अंधानेर-जेहूर-बोलठाण रस्त्यासाठी १.५ कोटी, तर वेरुळ-विटखेडा आणि कन्नड-चापानेर-मुंडवाडी मार्गांच्या सुधारणेसाठी ५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. हर्सूल जटवाडा ते पिशोर या महत्त्वपूर्ण रस्त्याचे सिमेंटीकरण व मजबुतीकरणासाठी ५ कोटी खर्च केले जाणार आहेत.
आंबेगाव तालुक्यातील संस्थेला राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कारमंचर : महिला व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्याची दखल घेत राज्य महिला आयोगाच्यावतीने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गार्गी काळे वळसे पाटील यांना राज्यस्तरीय ‘महिला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (ता.७) मुंबई येथील दादरच्या रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटकअकोला: शहरातील खडकी परिसरात पैशांच्या वादातून एका विधवा महिलेचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने संतापाच्या भरात महिलेची हत्या करून तिचा मोबाईल घेऊन फरार झाला होता. मात्र खदान पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला काही तासातच अकोट येथून अटक केल्याची माहिती खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक मनोज केदारे यांनी दिली.
Jalgaon Live : कर्जमाफीचा शब्द पाळला! पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत, तर खडसेंकडून सरकारवर टीकास्त्रराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. ६) सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला व ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित असलेला हा अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता. तो आज पूर्ण केला आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर झाल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर दुसरीकडे शेतीच्या इतर प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याचे विरोधकांसह शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे. एकूणच अर्थसंकल्पाविषयी संमिश्र प्रतिक्रिया लोकप्रतिनिधींसह व्यापारी, उद्योजक, सीए यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या आहेत.
Buldhana Live : राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या खाजगी बसला आगइंदोरहून अकोल्याला येणाऱ्या NL 07 B 0694 या खाजगी बसला आज नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर अचानक आग लागली. 30 प्रवाशांची तात्काळ बसमधून सुटका करण्यात आली.
Pune Live : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंगपुण्यातील शिवाजीनगर परिसरात डिलिव्हरी बॉयना तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तहान लागल्याचं कारण त्याने सांगितलं. तिने पाणी दिल्यानंतर तरुणीच्या हाताला स्पर्श करत "तू खूप सुंदर दिसतेस" असं म्हणत गैरवर्तन करण्याचा त्याने प्रयत्न केला.
Thane News: बदलापूर स्टेशनबाहेर दुकानात महिलांमध्ये जोरदार हाणामारीबदलापूर स्टेशनबाहेर एका दुकानात दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या दोन्ही महिला दोन वेगवेगळ्या दुकानात काम करणाऱ्या महिला आहेत. शौचालयाच्या चावीवरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर त्यांच्यात चांगलीच जुंपली. बदलापूर पुर्वेकडील अंबिका हॉटेलजवळच्या व्यापारी संकुलात हा प्रकार घडलाय. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. बदलापूर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करतायेत.
Mumbai News: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रोचा विशेष उपक्रमआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रोचा विशेष उपक्रम
८ मार्च रोजी मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) वरील दोन स्थानके पूर्णपणे महिलांच्या ताब्यात
मरोळ नाका आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानके महिला कर्मचाऱ्यांकडून संचलित
स्थानक नियंत्रण, तिकीटिंग, प्रवासी सहाय्य, सुरक्षा व देखभाल अशी सर्व जबाबदारी महिलांकडे
दिवसभरातील विविध शिफ्टमध्ये एकूण ८५ महिला कर्मचारी सांभाळणार कामकाज
अॅक्वा लाईनवर २७ महिला ट्रेन ऑपरेटर्सकडून मेट्रो गाड्यांचे संचालन
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये एकूण १,३८८ महिला कर्मचारी कार्यरत
शहरी वाहतूक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग आणि सक्षमीकरणाचा संदेश
Amravati: अमरावतीमध्ये विभागीय मिनी सरस वैदर्भी महोत्सवाचे आयोजनअमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने विभागीय मिनी सरस वैदर्भी महोत्सवाचे आयोजन
कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती..
या कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे ,आमदार रवी राणा, आमदार प्रवीण तायडे,आमदार संजय खोडके ,आमदार सुलभा खोडके, आमदार राजेश वानखेडे.. उपस्थित
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वैदर्भी महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलचे झाले उद्घाटन
या ठिकाणी या वैदर्भी महोत्सवात बचत गटाच्या वतीने विविध उत्पादनाचे लागले स्टॉल
N. Chandrababu Naidu: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भविष्यात चांगल्या सेवा देऊ शकतो - एन. चंद्राबाबू नायडूआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू म्हणाले, "मी सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानावर काम करत आहे. आयटी, क्वांटम, एआय. आंध्र प्रदेश या सर्व तंत्रज्ञानाच्या पुढे आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भविष्यात चांगल्या सेवा देऊ शकतो. आपण एक चांगली अर्थव्यवस्था देखील निर्माण करू शकतो. आपले पंतप्रधान एक अतिशय मजबूत सरकार आणि उत्कृष्ट सार्वजनिक धोरण देत आहेत. अलीकडेच, मी लोकसंख्या व्यवस्थापन धोरण सुरू केले. कालपर्यंत, आपण सर्व लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोलत होतो. आता आपण लोकसंख्या कशी वाढवायची याबद्दल बोलत आहोत. आता दक्षिण भारतात एक समस्या आहे. काही देशांनाही हीच समस्या भेडसावत आहे. मी येथेही तो मुद्दा उपस्थित केला. आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे जिथे आपण लोकसंख्या वाढीचा प्रयोग करत आहोत. ही सर्वात मोठी कसरत आहे. आता इतर राज्ये देखील यात सामील होत आहेत. जर तुम्ही लोकसंख्या व्यवस्थापन व्यवस्थापित करू शकत असाल तर भारताला कोणीही हरवू शकत नाही. हे घडणार आहे..."
सोशल मीडियावरील बंदीबाबत ते म्हणाले, "आम्ही १३ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्याची परवानगी द्यावी की नाही यावरही विचार करत आहोत." ते रोखता येईल. आम्ही यावरही काम करत आहोत. आम्ही त्यावर चर्चा आणि चर्चा करत आहोत..."
Pune Live : पुण्यातील भोर - महाड मार्गावर भीषण अपघातपुणे जिल्ह्यातील भोर - महाड मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर कोंढरी गावाच्या हद्दीत एक भरधाव कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील चार व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला आहेत.
Ratnagiri Live : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये LPG गॅस सिलेंडरचा तुटवडायुद्धजन्य परिस्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरची कमतरता जाणवत आहे.
Wardha Live News : दोन दिवस वर्ध्यात उष्णतेच्या लाटेचा इशारामार्च महिन्याच्या सुरवातीलाच सूर्य आग ओकू लागलाय.वर्धा जिल्ह्याचे तापमान सतत वाढत असून पुढील दोन दिवस जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर निघणे टाळावे अस आवाहन प्रशासनाने केले आहे.
mumbai live : लोकल वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाडअंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी 2 वाजून 11 मिनिटांची लोकल बदलापूर स्थानकातच रखडली.
खांडबारा रेल्वे स्थानकावर एका माथेफिरू तरुणाचा धिंगाणा...खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...
नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका माथेफिरू तरुणाने थेट उभी असलेल्या रेल्वेच्या डब्याच्या छतावर चढून हायव्होल्टेज ओव्हरहेड वायरजवळ धिंगाणा घातल्याने काही काळ स्थानकावर एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरत-भुसावल मार्गावरील पॅसेंजर गाडीच्या छतावर चढलेल्या या तरुणामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने त्या मार्गावरील विद्युत पुरवठा बंद केला. रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी जवळपास अर्धा ते एक तास प्रयत्न केल्यानंतर संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश मिळवले.
डीजे नाही, तर हातात झाडू घेऊन साजरी केली शिवजयंती...अंबागड किल्ल्यावर जांबच्या शौर्यमित्रांनी राबविली स्वच्छता मोहीमडीजे नाही, तर हातात झाडू घेऊन साजरी केली शिवजयंती...अंबागड किल्ल्यावर जांबच्या शौर्यमित्रांनी राबविली स्वच्छता मोहीम
संपूर्ण महाराष्ट्रात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या, मात्र भंडारा जिल्ह्यातील जांब येथील 'शौर्यमित्र बहुद्देशीय संस्थेने' एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक अंबागड किल्ल्यावर जाऊन संपूर्ण गड परिसराची स्वच्छता करत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. मोहिमेची सुरुवात गडपूजनाने झाली. त्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भंडारा विभागाच्या सहकार्याने किल्ल्यावरील कचरा साफ करण्यात आला. महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी महिलांनी 'शिवभजन' सादर करून वातावरण शिवमय केले. केवळ स्वच्छताच नाही, तर उपस्थित तरुण आणि विद्यार्थ्यांना शिवरायांचे गड-संवर्धनाचे विचार सांगून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.
Akola Live: अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामाअकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिलाय. महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे नाराज असलेल्या रावदेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलाय. कपिल रावदेव हे अकोला शहरातील काँग्रेसचे जुने, निष्ठावंत आणि वैचारिक फळीतील प्रमुख नेते समजले जातात. काँग्रेसमधला ब्राह्मण समाजातला प्रमुख आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून कपिल रावदेल यांची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहेय. काँग्रेसने सातत्याने डावल्यामुळे पक्ष सोडत असल्याचं रावदेव यांनी स्पष्ट केलय.
Parbhani Live: परभणीत इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणाला मारहाणपरभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील एक तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘द पिताश्री ऑफ ऑल इस्लामीक पातशहा’ अशा आशयाची पोस्ट टाकली होती ज्यामुळे मुस्लिम समुदायाच्या ८ ते ९ जणांनी या तरुणाला मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली आहे ज्यामुळे राणीसावरगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्यासह इतर अधिकारी रात्रभर राणीसावरगाव येथे तळ ठोकून होते या प्रकरणी पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून जवळपास ९ जनावर पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीना अटक करण्याच्या मागणीसाठी आज राणीसावरगाव बंदची हाक देण्यात आली आहे.गावात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन पोलीस लक्ष ठेवून आहेत
LPG Gas News: कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवालअमेरिका आणि इराणमध्ये युद्धाच्या झळा भारतातही दिसू लागल्यात.. घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला असून व्यासायिक गॅस सिलिंडर वितरणाला सरकारने मज्जाव केलाय.. मात्र रुग्णालयांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची गरज पडत असल्याने हे सिलेंडर द्यायचे की नाही? असा प्रश्न वितरकांना पडलाय.. सरकारकडून अद्याप ठोस गाईडलाईन आल्या नसल्याने वितरकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.. सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर बाबत गाईडलाईन सुनिश्चित कराव्यात अशी मागणी वितरकांनी केली आहे.
Ahilyanagar Live : टेंडर वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक; जीवे मारण्याची धमकी, राहात्यात खळबळटेंडर दुसऱ्या व्यक्तीला दिल्याच्या वादातून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात घडली आहे. भाजपचे नगरसेवक तसेच सुजय विखे यांचे निकटवर्तीय दहरथ तुपे यांना धमकी दिल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी राहाता शहराचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक एकत्र आले. तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार सदाफळ आणि त्याच्या काही साथीदारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Live : गॅस सिलेंडर महागला! घरगुती ६० रुपयांनी तर कमर्शियल ११५ रुपयांनी वाढघरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८५६ रुपये होती; मात्र ६० रुपयांची वाढ झाल्याने आता त्याची नवी किंमत ९१६ रुपये झाली आहे. दरम्यान, कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमतही वाढली आहे. आधी १७८४ रुपये असलेला कमर्शियल सिलेंडर ११५ रुपयांनी महागला असून आता त्यासाठी १८९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
Indore Live : योग्य मोबदल्यासाठी मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; इंदोर महामार्गावर वाहतूक ठप्पभूसंपादनासाठी योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांनी इंदोर महामार्गावर लोटांगण आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान शेतकरी आक्रमक झाले असून, योग्य मोबदला दिल्यासच आम्ही जमीन देण्यास तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या आंदोलनामुळे महामार्गावर जवळपास एक तास वाहतूक खोळंबली आणि सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
Amravati Live : अमरावतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 39.8°; 40 अंश पार होण्याची शक्यताविदर्भात उन्हाळ्यात नेहमीच सर्वाधिक उष्णता जाणवते. यंदा फेब्रुवारी संपताच अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवू लागला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने रौद्र रूप धारण केले असून अमरावतीत पारा 39.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. हवामान खात्याने आज तापमान 40 अंशांचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील 14 वर्षांत मार्चच्या पहिल्या आठवड्यात इतक्या उच्च तापमानाची नोंद झालेली नव्हती.
या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यांत अमरावतीसह संपूर्ण विदर्भात विक्रमी उष्णता पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उकाड्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील काही रस्त्यांवर वर्दळ कमी दिसून येत आहे, तर रसवंतीगृह, लिंबू सरबत, मलाई लस्सी आणि ताक केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसत आहे.
Satara News : चिंचणेर वंदनमध्ये एकजुटीने दारूची बाटली आडवी, रणरागिणींचा एल्गार; ६५६ विरुद्ध २२ मतांनी विजयीशाहूनगर : सैनिकांचे गाव म्हणून ओळखणाऱ्या चिंचणेर वंदन (ता. सातारा) येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देत महिलांनी एकजुटीने दारूची बाटली आडवी केली. विशेष मतदानात तब्बल ६५६ मताधिक्याने दारूबंदीचा ठराव मंजूर करत महिलांनी आपल्या आत्मसन्मानाचा आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्याचा विजय खेचून आणला.
Nagpur Live: कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावाकामठी शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका दिवसात तब्बल १४ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पेरकीपुरा परिसरात माजी नगरसेविका शांता विनायक गायधने यांना मांडी आणि हाताला कुत्र्याने चावा घेतला, तर मोदी पडाव राम मंदिराचे पुजारी महेश मधुकर देवपुजारी यांनाही कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. जखमींमध्ये पाच महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश असून सर्व जखमींवर कामठी उपजिल्हा रुग्णालय तसेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासावर तातडीने नियंत्रण आणावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.कामठी शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका दिवसात तब्बल १४ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जखमींमध्ये ५ महिला आणि ९ पुरुषांचा समावेश असून त्यांच्यावर कामठी उपजिल्हा रुग्णालय तसेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रमणीनगरच्या माजी नगरसेविका शांता विनायक गायधने यांना पेरकीपुरा परिसरात मांडी आणि हाताला चावा लागला, तर मोदी पडाव राम मंदिराचे पुजारी महेश मधुकर देवपुजारी यांनाही कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान दुसऱ्या एका प्रकरणात लोकांना भविष्य सांगत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवत मोठी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. अंजनेय ज्योतिष केंद्राच्या नावाने कार्यालय चालवणाऱ्या सचिन देशमुख याने ५० ते ६० जणांची सुमारे १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुख फरार झाला असून सायबर पोलिसांनी त्याच्या कार्यालयाला सील ठोकले आहे.
Sangli News : ईश्वरपूरमध्ये उद्या महिला दिनी ग्रंथदिंडीईश्वरपूर : जागतिक महिला दिनानिमित्त इनरव्हील क्लब ऑफ ईश्वरपूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथदिंडी व पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आयोजक संगीता शहा यांनी ही माहिती दिली.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष शामराव पाटील आहेत. शहा म्हणाल्या, ‘‘ग्रंथदिंडी सोहळा म्हणजे जीवन समृद्ध करणाऱ्या वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याबरोबरच पारंपरिक वेशभूषेद्वारे भारतीय संस्कृती व इतिहासाचे दर्शन घडविणारा उपक्रम आहे. महिलांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ३० व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या ग्रंथदिंडी व वेशभूषा स्पर्धेच्या संयुक्त सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हावे.’’ रविवारी (ता. ८) सकाळी ९ वाजता तहसील चौकातून ग्रंथदिंडीची सुरुवात होऊन राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी सभागृहात समारोप होणार आहे.
Sangli News : कृष्णा नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह आढळलासांगली : येथील बायपास रस्त्यावरील पुलावरून कृष्णा नदीत उडी मारलेल्या दीपक प्रकाश कातारी (वय २७, संभाजी कॉलनी, सांगली) याचा मृतदेह आज आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (ता. ४) सकाळी नऊच्या सुमारास बायपास रस्त्यावरील पुलावरून सांगलीतील संभाजी कॉलनीतील दीपक कातारी याने नदीमध्ये उडी मारल्याची दुर्घटना घडली होती. माहिती मिळताच सांगली शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
Solapur News : 15 दुचाकी पळवणारा चोरटा जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; सहा जिल्ह्यांतून चोरल्या दुचाकीसोलापूर : पंढरपूरमधील नामदेव बबत चुनाडे याने सोलापूरसह सहा जिल्ह्यांतून आठ लाख ८० हजार रुपयांच्या १५ दुचाकी चोरल्या. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला जेरबंद करीत चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
Sangli Crime : हद्दपार गुन्हेगार गोट्या कलढोणे मुख्य सूत्रधारसांगली : इंदिरानगर येथील बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैशाळे (वय २९) याचे अपहरण करून विठ्ठलनगर येथील सुनसान जागेत कोयत्याने खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅरेलमध्ये भरून तो विहिरीत फेकून देण्यात आला होता. या खुनातील मुख्य सूत्रधार श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय २४, जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे, इंदिरानगर, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले. गोट्या याच्यावर शहर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली होती, तरीही त्याचा वावर घटनास्थळावरील पडीक इमारतीत होता. हद्दपार गुन्हेगाराने केलेल्या खुनाने शहरात खळबळ उडाली आहे.
Ajinkyatara Fort : अजिंक्यतारा सुशोभीकरणास १३५ कोटींचा निधी मंजूर, मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यशसातारा : येथील संगम माहुलीतील महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरण करणे आणि अजिंक्यतारा किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी १३३ कोटी रुपये, तर किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण व संवर्धनासाठी १३५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला या अर्थसंकल्पात एकूण ३५८ कोटींचा विकास प्रकल्प मंजूर झाले आहेत.
Satara ZP News : सातारा झेडपी अध्यक्षाची २० मार्चला निवडसातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, २० मार्चला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदांची निवड संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी पाटील यांनी नियुक्त केलेल्या उपजिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ मार्चला सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहेत. त्याबाबत आज नोटीस बजावणीसाठी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
Satara News : दहिवडीच्या नगराध्यक्षपदी वर्षाराणी सावंत विराजमानदहिवडी : येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या वर्षाराणी विलास सावंत आज विराजमान झाल्या. सोनिया गोरे यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला. या वेळी काढलेल्या जंगी मिरवणुकीत मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Saeed Khatibzadeh : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धारLatest Marathi Live Updates 7 March 2026 : ‘‘अमेरिका आणि इस्राईलकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या विरोधात देशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांचा शौर्याने मुकाबला करण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार,’’ असा निर्धार ठाम प्रतिपादन इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी शुक्रवारी रायसिना डायलॉग’ परिषदेत सहभाग घेताना केला. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.