इराणच्या ड्रोनपासून वाचवणार कोण ? रशिया-युक्रेन युद्धातील या 'हीरो'ला मध्य-पूर्वेत धाडणार अमेरिका
Tv9 Marathi March 08, 2026 01:45 AM

ध्य पूर्वेत इराणचे शेजारील देशांवरील हल्ले सातत्याने घातक होत आहेत. इस्राईल आणि अमेरिकेने इराण विरोधात २८ फेब्रुवारी रोजी युद्ध छेडले आहे. त्यात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोक ठार झाले आहेत. इराणच्या ड्रोन हल्ल्यांपासून मित्र देश इस्राईलला वाचवण्यासाठी आता ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेन युद्धात वापरली जाणारी एण्टी ड्रोन सिस्टीम आता अमेरिका मध्य पूर्वेत तैनात करणार आहे. दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

इराणने ड्रोन हल्ले करुन मध्य-पूर्वेतील देशांना टार्गेट केले आहे. त्यामुळे आता अमेरिकने युक्रेन आणि रशियाच्या युद्धात वापरली जाणारी एण्टी ड्रोन सिस्टीमची मध्य पूर्वेत तैनाती करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणी क्षेपणास्रांना पाडणारी पॅट्रिएट आणि THAAD मिसाईल सिस्टमचा वापर करत आहे. परंतू अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की मध्य पूर्वेत परिणामकारक एण्टी ड्रोन सुरक्षा मर्यादित आहे. या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यामुळे आम्ही युक्रेन युद्धात वापरली जाणारी एंटी-ड्रोन सिस्टम ‘मेरोप्स’ला मध्य पूर्वेत तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

इराणच्या शाहेद ड्रोन – १३५ चा मुकाबला करणे कठीण

इराणच्या शाहेद ड्रोन – १३५ चा मुकाबला करणे कठीण बनले आहे. या मुकाबला अमेरिकेचे महागडे तंत्रज्ञान करु शकत नाही. कारण युक्रेनमध्ये रशिया ज्या ड्रोनचा वापर करत आहे त्याच ड्रोनचे बेसिक व्हर्जन इराण वापरत आहे. त्यामुळे रशिया युक्रेनच्या युद्धात ही यंत्रणा चांगल्या प्रकारे वापरत आहे. रशियाने हे तंत्रज्ञान इराण दिले आहे. मध्य पूर्वेतील देशांची तक्रार आहे की त्यांना इराणच्या ड्रोन आणि मिसाईलचा मुकाबला करण्याची तयारी करण्यास पुरेसा अवधी दिला गेला नाही. त्यामुळे दुबईसह अनेक देशांवर इराणने ड्रोन हल्ले करुन त्यांना बेजार केले आहे.

इराणच्या ड्रोनपासून वाचवणार कोण ?

यूक्रेनमध्ये नोटा राष्ट्रांनी रशियाच्या ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी मेरोप्स नावाची एण्टी ड्रोन सिस्टीम वापरली आहे. ही यंत्रणा ड्रोनना टार्गेट करण्यासाठी उपयोगी पडते. हे उपकरण इतके छोटे आहे की एखाद्या मध्यम आकाराच्या पिकअप ट्रकच्या मागेही देखील फिट होऊ शकते. ड्रोनला ओळखून ही यंत्रणा त्यांचा निकाल लावते. सॅटेलाईट आणि इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन जाम झाल्यानंतरही ही यंत्रणा आर्टीफिशियल इंटेलिजन्सवर काम करुन त्यांना नेव्हीगेट करु शकते.

हाय स्पीड मिसाईलना ओळखण्यासाठी तयार केलेली रडार सिस्टीम ड्रोनचा छडा लावण्यास असमर्थ ठरते. कारण त्यांना पक्षी आणि किंवा विमान समजले जाऊ शकते. मात्र, मेरोप्स सिस्टीम ड्रोनला अचूक ओळखणे आणि त्यांना पाडण्यासाठी डिझाईन केली आहे. खास म्हणजे ही सिस्टीम ५० हजाराहून कमी किंमतीच्या ड्रोनवर लाखो डॉलरची मिसाईल डागण्यापेक्षा स्वस्त आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.