सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७: सायन पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल १५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी स्थायी समितीत दिली. या पुलाच्या बांधकामाचा मूळ खर्च ४२ कोटी ६३ लाख ८९० होता. तो आता ४९ कोटी ९६ लाख ४३३ रुपयांवर गेल्याची बाब सदस्यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली.
सायन पुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी खर्चात सात कोटींनी वाढ झाल्याचा मुद्दा स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित करत पूल वाहतुकीसाठी कधीपर्यंत खुला होणार, असा सवाल केला. पुलाचे काम वेगाने सुरू असून सायन पूल १५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली.
Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणारमध्य रेल्वे मार्गावर असलेला ब्रिटीशकालीन ११० वर्षे जुना पूर्व आणि पश्चिम भागास जोडणारा हा सायन पूल धोकादायक झाल्याने तो पाडून २०२४ पासून पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. सायन रेल्वे स्थानकावरील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वेने पालिकेकडेसोपवले आहे. हा पूल रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधून जात असल्याने त्याच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रेल्वेने दिला होता. या कामासाठी येणारा पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वेमार्फत दिला जाणार आहे; मात्र पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम मुंबई महापालिकेने करावे, असे मध्य रेल्वेने स्पष्टपणे कळविले आहे. त्यामुळे पोहोच रस्त्याचा खर्च पालिका प्रशासन करणार आहे.
Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाची तारीख पे तारीखसायन पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते; मात्र आता पूल खुला करण्याबाबत नवीन तारीख समोर आली असून १५ ऑगस्टपासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे विपीन शर्मा यांनी सांगितले.