University Chauk Bridge: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचं काम आता पूर्ण झालं आहे. त्यामुळं चौकात दररोज होणारी वाहतुक कोंडी फुटणार आहे. कारण उद्या रविवारी महिलादिनी शिवाजीनगरहून बाणेरला जाणारी मार्गिका सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचं लोकार्पण होणार आहे, पीएमआरडीएनं याची घोषणा केली आहे.
Parth Pawar: राज्यसभेचा अर्ज भरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाची चर्चा होती सुरु! पण पार्थ पवार...पीएमआरडीएनं ट्विट करुन याची माहिती दिली आहे. यात म्हटलं की, "पुणेकरांचं बहुप्रतिक्षित स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे उभारण्यात आलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील 'डबल डेकर उड्डाणपूल' उद्या रविवार, दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण होणार असून, हा प्रकल्प पुणे महानगरातील वाहतुकीला नवा वेग देणारा ठरणार आहे.
Jay Pawar: रोहित पवारांनंतर आता जय पवारही मैदानात! अजित पवारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या VSR विमान कंपनीबाबत करणार मोठा खुलासा पुण्याच्या वाहतुकीला नवा आयाम देणारा महत्त्वाकांक्षी टप्पामेट्रो मार्गिका आणि वाहनांसाठी उड्डाणपूल एकाच खांबावर उभारण्यात आलेल्या या अभिनव प्रकल्पामुळं औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. पुणे महानगराच्या वाहतुकीला नवा आयाम देणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वास जाणार आहे.
Mumbai News: घाटकोपर मुंबईत की गुजरातमध्ये? महापालिकेची कागदपत्रे दिली जाताहेत गुजराती भाषेतून; हिंदू स्माशनभूमीत नेमकं काय घडलं? पाषाणकडील मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यातदरम्यान, काही महिन्यांपूर्वी औंधकडून शिवाजीनगरकडं जाणारी या उड्डाणपुलाची मार्गिका सुरु करण्यात आली होती. त्यानंतर आता उद्या ८ मार्चला शिवाजीनगरकडून बाणेरकडं जाणारी मार्गिका सुरु होत आहे. त्यानंतर काही दिवसांतच शिवाजीनगरकडून पाषाणकडं जाणारी मार्गिका देखील सुरु होणार आहे.