टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. रविवारी (८ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटेनरने म्हटले होते की त्याचं लक्ष्य हे प्रेक्षकांना शांत ठेवण्याचेच आहे.
याआधी २०२३ वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यावेळीही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने आणि २०२६ टी२० वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2026) उपांत्य सामन्यापूर्वी सॅम करननेही असेच भाष्य केले होते. त्यावर आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) भाष्य केले आहे.
T20 World Cup : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बघितल्या गेलेला सामना कोणता? इंडिया-पाकिस्तान सामना राहिला तिसऱ्या क्रमांकावर...मिचेल सँटेनर (Mitchell Santner) म्हणाला होता की 'लक्ष्य प्रेक्षकांना शांत करणं आहेच, पण टी२० क्रिकेटमध्ये सातत्याने बदल होत असतात आणि अनेकदा टी२० क्रिकेट चंचल असते. जर आम्ही आमचं काम नेहमीप्रमाणे केलं, तर आम्ही मोठ्या संघांना धक्का पुन्हा देऊ शकतो. घरच्या प्रेक्षकांसमोर वर्ल्ड कप जिंकण्याचा दबाव त्यांच्या संघावर असणार आहे.' त्याच्या या विधानाबाबत पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला होता.
सूर्यकुमार म्हणाला, 'सर्वजण ही एकच ओळ सारखे बोलत आहेत, काहीतरी नवीन बोला. संघातील मूड चांगला आहे आणि या स्टेडियममध्ये खेळण्यास आम्ही उत्सुक आहोत, हे खास स्टेडियम आहे.'
याशिवाय सँटेनरने असंही म्हटलं होतं की जर पाटा खेळपट्टी असेल, तर भारतीय संघाला २५० ऐवजी २२० धावांतच रोखण्याचा प्रयत्न करू.
T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोललात्यावर सूर्यकुमार म्हणाला, 'खोटं बोलतोय तो. आम्ही चांगली फलंदाजी करू. जर आम्ही २२५ किंवा २५० धावा केल्या, तर ते चांगलं असेल. कधी कधी खेळपट्टी वेगळी असते आणि त्यामुळे आम्हाला वेगळ्या प्रकारे खेळावं लागतं. आम्ही ड्रेसिंग रुममधून भविष्यवाणी करू शकत नाही की आम्ही किती धावा करू? खेळपट्टीची कशी मागणी आहे, त्यानुसार आम्ही खेळू.'
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.