Pune : पुणेकरांसाठी गुड न्यूज! डबल डेकर पूल आजपासून सेवेत, वाहतूक कोंडी फुटणार; कुणाला होणार फायदा?
Saam TV March 08, 2026 12:45 PM
  • पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित दुमजली उड्डाणपूल लवकरच सुरू होणार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण

  • मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल एकत्रित असलेला महत्त्वाचा प्रकल्प

  • बाणेर, पाषाण आणि विद्यापीठ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता

Savitribai Phule Pune University New Double Decker Flyover पुणेकरांच्या आनंदात भर पाडणारी बातमी समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुल लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. आज या पुलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. यानंतर हा पूल सुरु होणार आहे. या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन प्रवास सुखकर होणार आहे.

पुण्यातील नागरिकांच्या वाहतूक कोंडीबाबत अनेक तक्रारी वारंवार समोर येताना पाहायला मिळतात. या वाहतूक कोंडीचं जाळं सोडवण्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना करत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.

Parbhani : पोलीस दलात खळबळ! परभणीत हवालदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

मेट्रो मार्गिका आणि उड्डाणपूल अशा एकत्रित स्वरूपामुळे या चौकातील सिग्नलवरील ताण कमी होऊन वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, विद्यापीठ रस्ता, पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे लोकार्पण होऊन हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे यांच्यासह जिल्ह्यातील विधानपरिषद व विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.