इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प आपटले तोंडावर, तब्बल 18 गुप्त खळबळ उडवणारे अहवाल हाती, इराणमध्ये कधीच…
GH News March 08, 2026 01:13 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून धक्कादायक निर्णय घेत आहेत.  डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक इराणवरील युद्धाची घोषणा केली. इस्त्रायलसोबत मिळून अमेरिका इराणवर हल्ला करत आहे. इराणच्या मुख्य शहरांवर टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. या युद्धात अनेक लोकांचे जीव गेले. इराणकडूनही थेट हल्ले केले जात आहेत. आखाती देशांमध्ये इतर देशांचे नागरिक मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. दुबईच्या विमानतळावरही मोठा हल्ला करण्यात आला. या युद्धाला आठ दिवस पूर्ण झाली असून युद्धाची झळ सर्वच देशांना बसत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबले पाहिजे, अशी भूमिका जगातील अनेक देशांची आहे. महागाईमध्येही युद्धामुळे भडका उडताना दिसत आहे. इराण आणि इस्त्रायलकडून गॅस आणि तेल प्रकल्पांवर हल्ले केले जात आहेत. ज्यामुळे कतारसह अन्य देशांनी रिफायनरी थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला. यामुळे जगातील अनेक देशांमध्ये तेल आणि गॅसचे अत्यंत मोठे संकट आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणमध्ये सत्तापरिवर्तन हवे आहे. मात्र, धक्कादायक रिपोर्टपुढे आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालील जमीन सरकली. या गुप्त रिपोर्टमध्ये काही धक्कादायक खुलासे करण्यात आली आहेत. इराणसोबतच्या युद्धात सर्वाेच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना ठार केल्यानंतर मोठा विजय मिळवल्याचे  डोनाल्ड ट्रम्प यांना वाटले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचे सत्तापरिवर्तनाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. वॉशिंग्टन रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर एजन्सीने याअभियानाच्या यशावर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमेरिकेच्या गुप्तचर एजन्सीच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने कितीही हल्ले इराणवर केले आणि त्यांच्या लष्कराला संपवले तरीही इराणी सैन्याचा धार्मिक ढांचा खूप जास्त मजबूत आहे. सर्वाेच्च नेता नसतानाही इराणमध्ये सरकार चालले आहे. सर्वाेच्च नेत्याला ठार करण्यात आल्यानंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीची प्रक्रिया इराणमध्ये सुरू आहे. असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स पुढच्या नेत्याची निवड प्रक्रिया करेल.

ज्यामध्ये इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सी भूमिका महत्वाची असेल. मुजतबा खामेनेई याच्या नावाचा विचार होऊ शकतो. दुसरीकडे सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणा कोणतीही मागणी न करता आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्यावर इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, इराणचे भाग्य इराणची जनताच ठरवे, हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का होता.

अमेरिका इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले करत असतानाही इराण किंवा इराणची जनता हार मानताना दिसत नाहीये. युद्ध पुढे सुरू असल्याने अमेरिकेलाही फटका बसताना दिसत आहे. इराणमधील सत्तापरिवर्तन होणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकणार नाहीये. अमेरिकेच्या 18 गुप्तचर एजन्सीच्या रिपोर्टनुसार, फक्त बॉम्ब हल्ले करून इराणमध्ये सत्तापरिवर्तन होणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.