Rapido Rider Viral Video: गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्री प्रवास करताना देखील महिलांच्या मनात एक भीती असते… अशात रॅपिडो रायडर यांनी देखील महिलांसोबत वाईट कृत्य केल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यामुळे रॅपिडो बाईकने जाण्यासाठी देखील अनेक महिला घाबरतात. अशात अता रॅपिडो रायडरने अशी शक्कल लढवली आहे, ज्यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे… एका तरुणीने व्हिडीओ पोस्ट करत रॅपिडो रायडरबद्दल सांगितलं आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रॅपिडो रायडर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
तरुणीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रॅपिडो रायडरने एक युक्ती लढवली आहे. ज्याचं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे. रायडरने पाठीवर बॅग लावली आहे… तरुणीने रायडरला पाठीवर बॅग का लावली… अशा प्रश्न विचारल्यानंतर, त्याने मन जिंकणारं उत्तर दिलं आहे…
यह रैपिडो राइडर शारीरिक संपर्क से बचने के लिए अपनी पीठ पर एक बैग रखता है ताकि महिला यात्री सुरक्षित महसूस कर सकें। pic.twitter.com/MFw2yzBt8i
— ममता ट्राबल (@Mamtasulaniya)
रायडर म्हणाला, ‘महिला प्रवाशांना प्रवास करताना असहज वाटू नये आणि ब्रेक दाबल्यानंतर शारीरिक स्पर्श होऊ नये म्हणून पाठीवर बॅग लावतो… पण काही महिला मला बॅग काढण्यासाठी सांगतात…’, यावर तरुणी म्हणाली, ‘महिलांचा शारीरिक स्पर्श होऊ नये म्हणून, रायडर पाठीवर बॅग लावतात. म्हणून कधीच त्यांना बॅग काढण्यासाठी सांगू नका…’, सध्या महिलेने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर अनेकांनी रायडरतं कौतुक केलं आहे.
सांगायचं झालं तर, महिलांच्या सुरक्षेबद्दल कायम प्रश्न उपस्थित होत असतो. आजच्या काळात लहान मुलींपासून वृद्ध महिलेपर्यंत अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेवर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. फक्त बाहेरच नाही तर, शाळेत आणि स्वतःच्या घरात देखील आता महिला सुरक्षित नाहीत. अशात, रॅपिडो रायडरच्या युक्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे… सध्या सर्वत्र रॅपिडो रायडरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.