International Banking : कोल्हापुरातून जर्मनीत होतात सर्वाधिक व्यवहार; ६९ देशांत उलाढाल, सुमारे १२०० कोटींहून अधिक उलाढाल
esakal March 09, 2026 04:45 PM

कोल्हापूर :   जिल्ह्यातून जगभरातील तब्बल ६९ देशांत पैशांची देवाणघेवाण होते. जिल्ह्यातील तीन बॅंकांमधून ही देवाणघेवाण होते. पैकी एका बॅंकेतील वार्षिक आकडा सुमारे चारशे कोटींहून अधिक आहे.

तीन बॅंकांचा संदर्भ घेतल्यास सुमारे १२०० कोटींहून अधिक उलाढाल होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. सर्वाधिक व्यवहार जर्मनी या देशात होत आहेत. कोल्हापूर जिल्हा आर्थिक घडामोडीत आघाडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरी! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव

औद्योगिक तसेच पर्यटन जिल्हा म्हणूनही कोल्हापूरची ओळख आहे. येथील फाउंड्री व्यवसायातून जगातील १५०हून अधिक देशांत उलाढाल होते. मात्र, गेल्या वर्षभरातील जिल्ह्यातील तीन बॅंकांमधून झालेली उलाढाल पाहता ती ६९ देशांत झाल्याचे आकडेवारी सांगते. जर्मन देशात औद्योगिक उलाढाल अधिक होत असल्यामुळे तेथे अधिक व्यवहार होत असल्याचे
सांगण्यात आले.

म्हणून होतात व्यवहार

सर्वसाधारणपणे नोकरी, पर्यटन, प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अशा चार पद्धतीने इतर देशांसाठी व्यवहार केले जातात. यासाठी मोजक्या बॅंका आणि त्यांच्या मोजक्या शाखांची निवड केली आहे. यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. प्रत्येक देशाच्या चलनाप्रमाणे त्यांचे पैसे रूपांतरित पद्धतीने दिले जातात. यासाठी ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते.

Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरी! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव देश आणि वर्षभरात झालेल्या व्यवहारांची संख्या

हॉगकॉंग.............................. ३४

युएई................................ १३८

अन्गोला.............................. १५

अर्जेंटिना............................... १

ऑस्ट्रेलिया............................. ४

बांगलादेश.............................. ३

बेल्जियम............................. २१

बल्गेरिया............................... १

ब्राझिल............................... १०

कॅनडा................................ ३८

स्वित्झर्लंड............................. ९

चीन................................. ११२

सायप्रस............................... ११

झेक प्रजासत्ताक........................ ३

जर्मनी............................... ९०३

डेन्मार्क................................. २

अल्जेरीया.............................. ४

इजिप्त................................. ११

स्पेन.................................. ११

स्पेशल इकॉनॉमीक झोन................ १

फिनलंड.............................. १२

फ्रान्स ................................ ३७

ग्रेट ब्रिटन........................... १२७

जॉर्जिया................................. २

घाना................................... १

ज्युनिया................................ १

इक्वेटोरियल ज्युनिया.................. ९

हंगेरी................................... ४

इंडोनेशिया............................ १८

आयर्लंड............................ ७५५

इस्त्रायल................................ १

इराक................................... ६

इटली................................. ५३

जमैका.................................. ४

जपान.................................. ७

केनिया................................ २५

कझाकिस्तान.......................... ७

दक्षिण कोरिया......................... ३

केमॅन आयलॅण्ड....................... ४

श्रीलंका................................. ७

ल्युथिओनिया.......................... १

मार्शल आयलॅण्ड..................... १२

मॉरिशियस............................ २०

मालदीव................................ १

मालवी................................ १६

मेक्सिको............................... ५

मलेशिया................................ १

नायजेरिया............................ ११

नेदरलॅंड.............................. ३९

नेपाळ................................ ४७

न्यूझीलंड............................... ४

पेरू.................................... ३

फिलिफाईन्स........................... ५

पोलंड.................................. ९

कतार................................. १०

रोमानिया............................... १

सौदी अरेबिया........................ १६

स्वीडन................................. १

सिंगापूर............................... ७५

स्लोव्हेनिया............................. ३

थायलंड.............................. ४९

तुर्कस्थान............................. २८

तैवान.................................. ३

टांझानिया............................. १५

युगांडा.................................. १

युएसए................................ २७

उरुग्वे................................... १

उजबेकिस्तान.......................... ५

व्हिएतनाम............................. ४

झांबिया................................. ३

एकूण ३४६१

१ एप्रिल २०२५ ते ६ मार्च २०२६ पर्यंतची आकडेवारी

‘जिल्ह्यातील तीन राष्ट्रीयीकृत बॅंकांतून परदेशी चलनाचे व्यवहार होत आहेत. गेल्या वर्षभरात साधारण ६७ देशांत असे व्यवहार झाले आहेत. जर्मनीमध्ये व्यावसायिक संबंध असल्यामुळे त्यांची उलाढाल अधिक असल्याचे दिसून येते.

वर्षात साधारण तीनही बॅंकांच्या शाखांतून सुमारे १२०० कोटींची उलाढाल होत असल्याचे दिसून येते. परदेशी चलनासाठी बॅंकेत स्वतंत्र व्यवस्था असून, याची नोंद भारत सरकारकडे होते.

- मंगेश पवार, लीड बॅंक अधिकारी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.