एका लेकराचा बाप असूनही 42 वर्षीय गुरुजींनी शिकवता शिकवताच वर्गातल्या विद्यार्थीनीला पटवत लग्नाची गाठ बांधली अन् आता..
जगदीश ढोले March 09, 2026 02:13 PM

Viral Teacher Student Marriage News: सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जिथे दररोज काही ना काही अजब गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका गुरुजींची पोस्ट फेसबुक आणि एक्स (Twitter) वर चर्चेचा विषय ठरली आहे. एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील 22 वर्षीय विद्यार्थिनीशी दुसरे लग्न केले असून, विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या पत्नीलाही या लग्नामुळे कोणतीही अडचण नाही, असा दावा या पोस्टमध्ये केला जात आहे.

काय आहे व्हायरल पोस्ट?

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये एक फोटो आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती, दोन महिला आणि एक लहान मुलगा स्विमिंग पूलमध्ये आनंदात वेळ घालवताना दिसत आहेत. या पोस्टसोबत मजकूर लिहिला आहे, ज्याचा आशय असा आहे की, "हे आहेत 42 वर्षांचे मास्टरजी, ज्यांनी आपल्याच शाळेतील 22 वर्षीय विद्यार्थिनीशी दुसरे लग्न केले आहे. विशेष म्हणजे मास्टरजींच्या पहिल्या पत्नीलाही याची काहीच हरकत नाही. आम्ही फक्त रांगेत उभे राहण्यासाठी आणि जनगणना वाढवण्यासाठी जन्माला आलो आहोत असे वाटते, खरी लाईफ तर मास्टरजी जगत आहेत!"

नेटिझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

हा फोटो आणि त्यासोबतचा मजकूर पाहून सोशल मीडिया युजर्सनी मजेशीर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "मास्टरजी शाळेत सिलॅबस शिकवायला जातात की हृदयाचे धडे द्यायला?" असा प्रश्न काही जण विचारत आहेत. तर काहींनी "आमचे नशीबच खराब आहे" म्हणत स्वतःची खंत व्यक्त केली आहे. "काही दिवसांनी मास्टरजींच्या तिसऱ्या लग्नाचा ट्रेंड येईल," अशीही मिश्किल टिप्पणी केली जात आहे.

फॅक्ट चेक: दाव्यात किती तथ्य?

सध्या ही बातमी सोशल मीडियावर केवळ एका विनोदी किंवा चटकदार पोस्टच्या स्वरूपात फिरत आहे. संबंधित व्यक्ती खरोखरच शिक्षक आहेत का? फोटोतील तरुणी त्यांची विद्यार्थिनीच आहे का? आणि हे त्यांचे दुसरे लग्न आहे का? याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. अनेकदा सोशल मीडियावर एखाद्या कुटुंबाच्या फोटोचा वापर करून अशा प्रकारच्या काल्पनिक कथा (Viral Stories) रचल्या जातात. त्यामुळे, जोपर्यंत ठोस पुरावा समोर येत नाही, तोपर्यंत याला केवळ सोशल मीडियावरील एक 'व्हायरल चर्चा' किंवा 'मीम' (Meme) म्हणून पाहिले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.