Hardik Pandya : हार्दिक-माहिका भर मैदानात स्टेजवरच झोपले, पुढे असं झालं, पाहा व्हीडिओ
GH News March 09, 2026 10:17 PM

भारताने टी 20i वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला. भारताने रविवारी 8 मार्चला न्यूझीलंडवर एकतर्फी फरकाने मात करत एकूण तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. इंडिया गतविजेता आणि यजमान म्हणून ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम ठरली. टीम इंडियाला विजयी करण्यात सर्वच खेळाडूंनी योगदान दिलं. टीम इंडियाने साखळीपासून ते अंतिम फेरीपर्यंत एकूण 9 सामने खेळले. या 9 सामन्यांमध्ये 9 वेगवेगळे खेळाडू मॅचविनर ठरले. यावरुन टीम इंडिया कोणत्या एका खेळाडूवर विसंबून नसल्याचं स्पष्ट झालं.

भारताचा दणदणीत विजय

टीम इंडियाने रविवारी न्यूझीलंडसमोर 256 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारताने न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर ऑलआऊट केलं आणि धमाका केला. टीम इंडिया जिंकताच डगआऊटमधील इतर खेळाडू, सपोर्ट आणि कोचिंग स्टाफ मैदानात आला. तसेच विजयानंतर खेळाडूंचे नातेवाईकही पाहायला मिळाले. या ऐतिहासिक क्षणी आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा मैदानात आली. या दरम्यान हार्दिक आणि पंड्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर माहिका धावत धावत मैदानात हार्दिकच्या दिशेने आली. हार्दिक आणि माहिका या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. माहिकाने हार्दिकला गालावर किस केला. दोघांनी डान्स करत आनंद साजरा केला. त्यानंतर दोघांचा एक असा व्हीडिओ व्हायरल झालाय ज्यावरुन संमिक्ष प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल व्हीडिओत नक्की काय?

व्हायरल व्हाडिओत हार्दिक आणि माहिका विजयी जल्लोषानंतर स्टेजवर झोपल्याचं दिसत आहे. या व्हीडिओवरुन नेटकऱ्यांकडून हार्दिकवर संताप व्यक्त केला जात आहे. हार्दिकला मर्यादेचा विसर पडलाय का? असा प्रश्न या निमित्ताने नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हार्दिकची ऑलराउंड कामगिरी

दरम्यान हार्दिकने या स्पर्धेतील 10 व्या पर्वात 9 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. हार्दिकने 9 सामन्यांमध्ये 160.74 च्या स्ट्राईक रेटने एकूण 217 धावा केल्या. हार्दिकने या दरम्यान एकूण 2 अर्धशतकं झळकावली. तसेच हार्दिकने एकूण 9 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.