दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज फलंदाज गॅरी कर्स्टन यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ संपल्यानंतर सनथ जयसूर्या यांनी पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. १५ एप्रिलपासून गॅरी कर्स्टन मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारणार असून त्यांना दोन वर्षांच्या करारावर नियुक्त करण्यात आले आहे.
५८ वर्षीय गॅरी कर्स्टन यांना प्रशिक्षक म्हणून दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०११ चा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. तसेच त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोहोचला होता. कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघाचेही मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक२०२४ मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांची वनडे आणि टी-२० संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. मात्र बोर्ड आणि खेळाडूंशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी केवळ सहा महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचेही ते मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. तसेच गुजरात टायटन्स संघाचे ते फलंदाजी प्रशिक्षकही होते.
श्रीलंका संघाने मागील काही वर्षांत आयसीसी स्पर्धांमध्ये मोठे यश मिळवलेले नाही. त्यांनी शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१४ मध्ये जिंकली होती. त्यानंतर संघाला कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही पोहोचता आलेले नाही. गेल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीही श्रीलंका पात्र ठरू शकला नव्हता. पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कर्स्टन यांच्यासमोर आता मोठे आव्हान असणार आहे.
Afghanistan Cricket Coach: ट्रॉट यांचा अफगाणिस्तानला निरोप; चार वर्षांपूर्वी योगायोगाने प्रशिक्षकपदावर विराजमानगॅरी कर्स्टन यांनी १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १०१ कसोटी आणि १८५ वनडे सामने खेळले आहेत. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ४५ च्या सरासरीने ७,२८९ धावा केल्या असून त्यात २१ शतके आणि ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये त्यांनी ४१ च्या सरासरीने ६,७९८ धावा केल्या आहेत. वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी १८८ धावांची सर्वोच्च खेळी करण्याचा विक्रम आजही गॅरी कर्स्टन यांच्या नावावर आहे.