Chanakya Niti : मित्र कितीही जवळचा असू द्या, पण या चुका कधीच करू नका, पश्चाताप कराल
Tv9 Marathi March 10, 2026 01:45 AM

चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आपला खरा मित्र कोण? आदर्श मैत्री कशाला म्हणावं? कोण आपल्या सोबत मैत्रीचं नाटक करत आहे, हे कसं ओळखावं. स्वार्थी आणि कपटी मित्राची लक्षण काय असतात? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात मैत्री इतकं दुसरं सुंदर नातं नाही. आपल्यावर जेव्हा संकट येतं, तेव्हा एकवेळ आपले नातेवाईक आपल्या कामाला येत नाहीत, मात्र मित्र संकटाच्या काळात कायम आपल्या मदतीला धावून येतात. तीच खरी मैत्री असते. मात्र मैत्री करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे मैत्री कधीही आपल्या बरोबरीच्या व्यक्तीसोबत करावी, जर तुम्ही तुमच्यापेक्षा श्रीमंत माणसांसोबत मैत्री केली, किंवा तुमच्यापेक्षा गरीब व्यक्तीसोबत मैत्री केली तर ती मैत्री फार काळ टिकण्याची शक्यता नसते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात. या जगात मैत्री इतकं दुसरं सुंदर नात नाही, आपण आपल्या मनातील सर्व गोष्टी आपल्या मित्रांनाच सांगू शकतो. ते आपलं मन मोकळं करण्याचं एक हक्काचं ठिकाण असतं. मात्र जरी असं असलं तरी देखील आणि तो मित्र तुमच्या कितीही जवळचा मित्र असला तरीही काही गोष्टी या टाळायलाच पाहिजे, अन्यथा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संगत – चाणक्य म्हणतात एखादा व्यक्ती हा तुमचा खूप चांगला मित्र आहे, मात्र त्याला वाईट संगत लागली, तर तुम्ही त्याचे गुण कधीही घेऊ नका. अनेकदा चांगल्या सवयी लागण्यासाठी वेळ लागतो, मात्र वाईट सवयी लगेच लागतात. त्यामुळे जर तुमचा मित्र वाईट संगतीमध्ये असेल तर त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा, किंवा मग त्यांच्यापासून योग्य तेवढं अंतर ठेवा, यातच तुमचं भलं आहे.

या गोष्टी कधीही सांगू नका – चाणक्य म्हणतात तुमचा मित्र हा तुमच्या कितीही जवळचा असू द्या. मात्र पती -पत्नीमधील खासगी गोष्टी त्याला कधीही सांगू नका. जर तुमचा तुमच्या पत्नीसोबत वाद झाला असेल तर या गोष्टी मित्रांना सांगता कामा नये असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य यांनी पुढे असंही म्हटलं आहे की, तुमची जर काही कमजोरी असेल तर ती देखील मित्रांना कधीही सांगू नका, कारण भविष्यात मित्रही कधी-कधी शत्रू बनतो, अशावेळी तुम्ही अडचणीत याल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.