मोठी बातमी! युद्धात या महत्त्वाच्या देशाची थेट उडी, इराणवर थेट मोठं क्षेपणास्त्र डागलं; जगाची चिंता वाढली
GH News March 10, 2026 02:15 AM

Turkey Attack On Iran : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचा द्वितीय मुलगा मोजतबा खामेनेई यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इराणकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे आमच्या इच्छेविरोधात जो कोणी इराणचा प्रमुख होईल, त्याचाही आम्ही खात्मा करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आला आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आखातातील इतर देशही भीतीच्या छायेखाली आहेत. इराणने सौदी अरेबिया, बहारीन, यूएई अशा अनेक देशांवर हल्ले केले आहेत. याच हल्ल्यांना आता एका देशाने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता या देशाने थेट युद्धात उडी घेतली आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार तुर्की हा देश आता युद्धात उतरला आहे. या देशाने फायटर जेट एफ-16 च्या मदतीने इराणवर क्षेपणास्त्र डागले आहे. इराणच्या समुद्री क्षेत्रात हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे इराणचे नेमके काय नुकसान झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु आतापर्यंत या युद्धामध्ये अमेरिका-इस्रायल आणि इराण हे असे तीनच देश होते. परंतु आता या युद्धात तुर्कीनेही उडी घेतली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोजतबा यांना विरोध

दुसरीकडे इराणच्या सर्वोच्च नेतेपदावर मोजतबा खामेनेई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु या नियुक्तीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध केलेला आहे. आमच्या इच्छेविरोधात नेत्याची निवड केली तर आम्ही त्याचा खात्मा करू, असा इशारच ट्रम्प यांनी याआधी दिलेली आहे. त्यामुळे आता अमेरिका मोजतबा यांच्याविरोधात काही कारवाई करणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

हल्ल्याला इराण प्रत्युत्तर देणार का?

दरम्यान, आता तुर्कीने हल्ला केल्यानंतर आता इराण या हल्ल्याला काय प्रत्युत्तर देणार? का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.