पंचांग -
मंगळवार : फाल्गुन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.४८ सूर्यास्त ६.४१, चंद्रोदय रात्री १२,४७ चंद्रास्त सकाळी ११, भारतीय सौर फाल्गुन १९ शके १९४७.
दिनविशेष -
२००० - हलक्या लढाऊ विमानांच्या अत्याधुनिक ‘जेट फ्युएल स्टार्टर’ची (जेएफएस) लेहच्या अत्युच्च विमानतळावरील चाचणी यशस्वी ठरली.
२०१४ - पूजा घाटकरने आशियायी नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला.