Mumbai Dindoshi Crime : दिंडोशीतून अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाचा तब्बल तीन महिन्यांनी शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून 14 वर्षीय मुलाची (Dindoshi Crime) सुटका केलीय. फेस रेकग्निशन सिस्टीममुळे तीन महिन्यापूर्वी झालेल्या अपहरणाचा (Dindoshi) अखेर छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सतत इंस्टाग्रामवर रिल्स बघतो म्हणून वडील ओरडल्याने 16 वर्षीय मुलगा ६ डिसेंबरला घर सोडून निघून गेला होता. दरम्यान, मुलगा घर सोडून पळाल्याचं हेरून आरोपींनी मुलाला फूस लावली आणि त्याला राजस्थानमधील जैन देरासरमध्ये कॅटरिंगच्या कामाला जुंपल होतं. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत मुलाच शोध घातलाय. शिवाय अपहरण केल्याप्रकरणी दोघांना अटक देखील केली आहे. (Mumbai Dindoshi Kidnapping Case)
Dindoshi Crime : राजस्थानच्या जैन देरासरमधून मुलाची मुंबई गुन्हे शाखेने केली सुटका
दरम्यान, गेल्या ६ डिसेंबरला 14 वर्षीय मुलगा घरातून पळून गेल्यापासून त्याचा पत्ता नव्हता. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करूनही पोलीस काही करत नाही म्हणून मुलाच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. यावर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर 6 डिसेंबरला दिंडोशी परिसरातून 14 वर्षीय मुलाच अपहरण करण्यात आलं होत अखेर तीन महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावला असून राजस्थान मधील एका जैन देरासरमधून मुंबई गुन्हे शाखेने मुलाची सुखरूप सुटका केली आहे. तर मुलाला फूस लाऊन त्याला जैन देरासरमध्ये कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांनाही गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
Mumbai Dindoshi Crime : सतत इंस्टाग्रामवर असतो म्हणून वडील त्याला ओरडले, मुलानं रागाच्या भरात घर सोडलं
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा सतत इंस्टाग्रामवर असतो म्हणून वडील त्याला ओरडले, पण मुलाने त्यातून काही शिकायच सोडून त्याने त्याच्या घरालाच सोडचिठ्ठी दिली. आपला मुलगा येत नाही म्हणून कासावीस झालेल्या त्याच्या आई वडिलांनी सुरवातील आसपासचा परिसर पिंजून काढला पण मुलगा काही सापडला नाही शेवटी त्यांनी दिंडोशी परिसरात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला पण मुलगा काही मिळाला नाही, एक महिना लोटला दोन महिने झाले अखेर शेवटचा पर्याय म्हणून मुलाच्या वडिलांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार केली, आयुक्तांनी देखील प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या.
Mumbai Crime : फेस रेकग्निशन सिस्टीमचा वापर
गुन्हे शाखा कक्ष 12 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी पुन्हा नव्याने तपासाला सुरुवात केली, सुरूवातीला त्यांनी दिंडोशी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी सुरू केली त्यानंतर गोरेगाव रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजेस तपासण्यास सुरवात केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं जेव्हा गोरेगाव रेल्वे स्थानकातील फेस रेकग्निशन सिस्टीममध्ये मुलगा दिसला. मुलाने सहा तारखेला गोरेगाव रेल्वे स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने गाडी लोकल पकडली आणि तिथून थेट मरीन लाईन्स स्थानकात गेला आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर. तिथे तो एकटाच हिंडत असताना दोन अनोळखी माणसांनी त्याला हेरल, त्याची विचारपूस केली आणि तो घरून पळाल्याच समजताच त्याला त्यांच्या सोबत घेतलं, दुसऱ्या दिवशी ते त्याला वांद्रे टर्मिन्सवरून घेऊन गेले आणि तिथून थेट गुजरातच्या दिशेने रवाना झाले.
Mumbai Crime : मुलाचा चक्क सौदा केल्याची धक्कादायक माहिती
सुरुवातीला हे दोघे कोण होते आणि मुलाला नेमकं कुठे घेऊन गेले याचा काहीच नेम नव्हता, तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्यांचे नंबर मिळवले तर समजलं की हे दोघे अँटॉप हिल परिसरात केटरिंग व्यवसायाला मनुष्यबळ पुरवण्याचे काम करतात. त्या दोघांचा मोबाईल ट्रॅक करून गुन्हे शाखेचे अधिकाऱ्यांनी कासिम मुशरफ अली खान, 42 आणि महेंद्र कश्यप, 39 नावाच्या दोघांना ताब्यात घेतलं तर या दोघांनी मुलाचा चक्क सौदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या दोघांनी राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील एका जैन देरासरमध्ये केटरिंगच्या कामाला मुलाला जुंपल होत या अटीवर की मुलाला देण्यात येणारे पैसे देरासर त्यांना देणार आणि ते दोघं मुलाला त्यांच्या हिशोबाने पगार देणार होते. त्यानंतर राजस्थान मधील देरासर मधून गुन्हे शाखेने मुलाची सुटका केली. या मुलासह गुन्हे शाखा कक्ष 12 च पथक मुंबईला परतलं, दोन्ही आरोपींना त्यांनी दिंडोशी पोलिसांच्या हवाली केलं तर मुलाला त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं, आपल्या मुलाला तीन महिन्यांनी बघून त्याचे आई वडील दोघे भाऊक झाले होते.