Malaika Arora Cosy Moments: बॉलिवूडची (Bollywood News) मुन्नी मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा, पर्सनल लाईफमुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या मलायका मिस्ट्री मॅनमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यापासून, तिचं नाव नवनव्या मिस्ट्री मॅन्ससोबत जोडलं जात आहे. आधी 19 वर्षांनी लहान असलेला हिरे व्यापारी हर्ष मेहतासोबत तिचं नाव जोडलं गेलं. दोघे अनेकदा एकत्र स्पॉटही झाले. अशातच आता एका पार्टीत मलायका नव्या मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली. त्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी मलायकासोबत दिसलेला मिस्ट्री मॅन MTV Splitsvilla फेम सोराब बेदी असल्याचं बोललं जात आहे. मलायकापेक्षा वयाने लहान असलेल्या सोराबच्या मिठीत सामावून गेलेल्या मलायकाला पाहून सारेच आश्चर्यचकीत झाले आहेत.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच Splitsvilla स्टार सोराब बेदीसोबत (ज्याला 'राजमा चावल' म्हणूनही ओळखलं जातं) एका आलिशान पार्टीत कोझी होताना दिसली. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला, ज्यामध्ये मलायका सौरभसोबत नाचताना, अगदी सेक्सी डान्स मूव्ह करताना दिसली. या व्हिडीओमुळे इंटरनेटवर लगेचच चर्चांना उधाण आलं आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या 'डेटिंग'च्या चर्चांना सुरुवात झाली.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका आरोरा आणि सोराब म्युझिकवर नाचताना दिसतायत. अगदी एकमेकांच्या मिठीत सामावून गेले आहेत. डान्स करताना अगदी कोझी मूव्ह्सवर थिरकत आहेत. मलायका आणि स्प्लिट्सविला स्टारची जबरदस्त एनर्जी आणि रोमँटिक केमिस्ट्रीला पाहून चाहत्यांनी रिअॅक्ट करायलाही सुरुवात केलीय. अशातच मलायका नव्या मिस्ट्री मॅनसोबत रिलेशनमध्ये तर नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मलायका आणि सोराबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या मिठीत असून फोटो आणि व्हिडीओ शूट करत आहेत. यामध्ये सोराबनं मलायकाला आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवलंय. या दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहून अनेकजण थक्क झालेत. मलायका सोराबच्या इतक्या जवळ असल्याचं पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. सोराबनं इन्स्टाग्रामवर मलायकासोबतचे काही फोटोही पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये दोघेही एकत्र मजा करताना दिसत आहेत.