सातारा : सातारा शहरातील एका नामांकित निवासी शाळेतील वसतिगृहाचा केअरटेकरने शाळेतील मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित केअरटेकरला अटक करण्यात आली असून, त्याची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली आहे. अधिक तपासामध्ये शाळेतील तब्बल २४ मुलांना त्याने शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे समोर आले आहे.
Organ Donation: आईचा मुलासाठी धाडसी निर्णय! जटिल किडनी प्रत्यारोपणातून मुलाला मिळाले नवजीवन; तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांना आले यश..याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका निवासी शाळेतील केअरटेकर गेल्या काही दिवसांपासून मुलांना त्रास देत होता. त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने हात लावणे, पैसे मागणे, धमक्या देणे, मारहाण करणे असे प्रकार होत होते. २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रकार घडले. याबाबत काही मुलांनी पालक, तसेच शाळेतील शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शिक्षकांनी शनिवारी (ता. ७) याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सुरुवातीला शाळेतील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. केअरटेकरने सकाळी साडेसहाला तीन शाळकरी मुलांसोबत चार ते पाचवेळा अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे मुले भयभीत झाली. घडलेल्या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून त्याने मुलांना धमकीही दिली, तसेच मुलांना मारहाण करून हात पिरगळला, तसेच डोके आपटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने हालचाली करत केअर टेकरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आणखी २१ मुलांनी केअर टेकरने दिलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांची संख्या २४ वर गेली आहे.
Women farmer Success: मुंबईकरीन झाली प्रयोगशील पशुपालक शेतकरीण; राणी सावंत यांनी कळसकरवाडीत फुलवला मळा, घेतलेल्या निर्णयाचं साेनं केलं..गुन्हा दाखल झाल्यानंतर केअरटेकरला ताडीने अटक करण्यात आली. चौकशीमध्ये एकूण २४ मुलांना त्याने विविध प्रकारे त्रास दिल्याचे समोर आले आहे. पुढील तपासात काही गंभीर प्रकार समोर आला, तर गुन्ह्याचे कलम वाढविण्यात येईल.
- तुषार दोशी, पोलिस अधीक्षक