आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम हॉटेल व्यवसायावर
गॅस एजन्सी ना मिळणारा पुरवठा व्यवसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावर
कालच्या दिवसांपर्यंत हॉटेल व्यवसायिकांना मिळणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा होता सुरळीत
आता मात्र व्यावसायिक सिलेंडरची कमतरता, त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांच्या गॅस सिलेंडर पुरवठा निम्म्यावर
रत्नागिरी शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यवसायिक सिलेंडरचा दिला जातोय कोटा
रत्नागिरी शहरातल्या हॉटेल व्यवसायिकांना दिवसाला 600 ते 700 व्यवसायिक गॅस सिलेंडर आवश्यक
अशीच परिस्थिती राहिली तर व्यवसायाला मोठा फटका बसण्याची हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केली भीती
Petrol: देशात इंधनाचा तुटवडा नाही, HPCL कंपनीकडून मेसेजदेशभरातील ग्राहकांना HPCL कंपनीकडून मेसेज
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीकडून सर्व ग्राहकांना मेसेज
देशात इंधनाचा तुटवडा नाही
HPCL कंपनीकडून स्पष्टीकरण
देशभरात गॅस आणि इतर इंधनाचा भरपूर साठा उपलब्ध असल्याची कंपनीची माहिती
नागरिकांनी चिंता करू नये कंपनीकडून नागरिकांना करण्यात आले अश्वस्त
Pune Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यूशिक्रापूर पुणे येथे पुणे नगर रोड वर झालेल्या भीषण अपघातात महेश धोंडीराम भगत याचा मृत्यू झाला. रात्री २ वाजेच्या सुमारास नगर पुणे रस्त्यावरून एका समोरील दुभाजकावर वळण घेत असताना दुचाकीला मागून आलेल्या १७ सीटर वाहनाची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकी चालक अक्षरशः काही अंतरावर रस्त्याने घासत समोर गेला.
Kudal: कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाशसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परप्रांतीय विक्रेत्यांकडून बनावट भांडी विक्री व्यवसाय होत असल्याचे आढळून आले आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी बाजारपेठमध्ये याचा पर्दाफाश करण्यात आला. या विक्रेत्यांकडून विक्री केली जाणारी भांडी बनावट असल्याचे निदर्शनास आले. ही भांडी १०० रूपये एक नग अशी विक्री होत असून सामान्य नागरिक ही कमी किमतीत असल्याने खरेदी करीत आहे. ही भांडी पत्र्याची असून त्याला लोहचुंबक चिकटत असल्याचे दिसून येते. हा पत्रा निकृष्ट दर्जाचा असून काही नागरिकांनी भांडी विकत नेऊन त्यांचा वापर केला तर ती काळी पडली. हे विक्रते दिल्ली येथील असून या विक्रेत्यांकडे कोणताही व्यवसाय परवाना नाही. तसेच यांच्याकडील चारचाकी वाहनाचा परवाना नाही. या प्रकरणी कुडाळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
Dharashiv: धाराशिव जिल्हा परिषद सत्ता समीकरणात पुन्हा राजकीय हालचालीभाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदाला विरोध असणारा आमदार तानाजी सावंत गट पुन्हा सक्रिय झाला आहे.आमदार सावंत गटातील 8 सदस्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत तुळजापूर तालुक्यातील एक अपक्ष सदस्यही उपस्थित असल्याची माहिती आहे.त्यामुळे एकूण 9 सदस्यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.दरम्यान, शिवसेनेचे निवडून आलेल्या 15 सदस्यांपैकी 7 सदस्य पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबत असल्याची माहिती आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा आधी ठरलेला फॉर्म्युला सावंत गटाला मान्य नसल्याची चर्चा रंगली आहे.यामुळे धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया 13 मार्च रोजी पार पडणार असून,त्याआधीच सुरू झालेल्या हालचालींमुळे सत्ता स्थापनेच्या समीकरणात काय बदल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bhandara: वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदलभंडारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असताना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता. हीच बाब लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागानं जिल्ह्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत भरवण्याचा निर्णय घेतला आहे. आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक तसेच सर्व खासगी शाळा सकाळी भरतील. दुपारच्या कडक उन्हापूर्वीचं शाळा सुटणार असल्यानं विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आणि प्रथमोपचार किट ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे पालकांनी समाधान व्यक्त केलं असून, वाढत्या उष्म्यापासून मुलांचा बचाव होण्यास मदत होणार आहे.
नाशिक महापालिकेत भाजप, शिंदे सेना करणार १ वर्षासाठी स्वीकृत नगरसेवकनाशिक महापालिकेत भाजप, शिंदे सेना करणार १ वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक
भाजप आणि शिंदे सेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी एक वर्षाचा काळ, सूत्रांची माहिती
१० जागांसाठी मोठ्या प्रमाणात इच्छूक असल्याने एक वर्षाचा काळ देण्याचा भाजप आणि शिवसेना नेते विचार करत असल्याची माहिती
नाशिक महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष, भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवक पदासाठी ६ जागा
६ जागांसाठी भाजपकडे तब्बल ५०० जणांनी केले अर्ज
जास्तीत जास्त इच्छुकांना संधी देण्यासाठी एक वर्षाचा काळ देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता
तर शिंदेंच्या शिवसेनेकडे देखील स्वीकृत नगरसेवक पदासाठी २ जागा
यासोबतच ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे स्वीकृत नगरसेवक पदाच्या प्रत्येकी १ जागा
Solapur: सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी हालचालींना वेगसोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी हालचालींना वेग
जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष 18 मार्च तर पंचायत समिती सभापती साठी 12 मार्च रोजी होणार निवडणूक
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मिळाली आहे एक हाती सत्ता, आज गट नेत्याची निवड होणार
जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीसाठी भाजपकडून गटनेत्यांची निवड
सोलापूर झेडपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मुंबई वारी..
सोलापूर झेडपीच्या सत्तेच्या चाव्या मुंबईतूनच फिरणार..
Yavatmal: यवतमाळमध्ये शक्तिपीठसाठी शेतकरी जिल्हा कचेरीवरयवतमाळ जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गासाठी शेत जमिनीचे शासनाकडून मूल्यांकन करताना शेतकऱ्यांना योग्य बाजार बाजार भाव द्यावा या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली.जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून शक्तीपीठ महामार्गासाठी शेतजमिनी भूसंपादन करण्यात येत असताना शक्तिपीठ महामार्गाला विलंब का होताहेत असा प्रश्न शक्तीपीठ महामार्ग कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून विचारला आहे.
Pune: पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यानेच मागितली लाचपुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मधील प्रकार
२ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा
पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाची कारवाई
तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत एका उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
आरटीई प्रवेशासाठी तीन हजारांपेक्षा जास्त अर्जआरटीईतून होणाऱ्या 25% जागांकरिता आत्तापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार 240 अर्ज दाखल झाले आहेत.अर्ज दाखल करण्याकरिता मंगळवार हा शेवटचा दिवस असून यामुळे अर्जांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियमानुसार आर्थिक दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुला मुलींसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यामधून 25% राखीव जागा राहतात यवतमाळ जिल्ह्यातील इंग्रजी मराठी माध्यमांच्या 201 शाळांनी आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती या शाळांमध्ये 25% प्रमाणे दोन हजार 222 जागा आहेत.
Pune: अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला 'पीएमआरडीए'च्या महानगर आयुक्तपदाचा पदभारपुण्यात अभिजीत चौधरी यांनी स्वीकारला 'पीएमआरडीए'च्या महानगर आयुक्तपदाचा पदभार
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) नूतन महानगर आयुक्त म्हणून डॉ. अभिजीत चौधरी (IAS) यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला
मावळते महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याकडून चौधरी यांनी स्वीकारला पदभार
पुणे महानगर प्रदेशाच्या विकासाला गती देणार,डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास
मिरज पंचायत समिती सभापती निवडीवरून अपहरण नाट्य ! शिवसेना शिंदे गटाच्या सदस्याच अपहरण केल्याचा आरोप..सांगलीच्या मिरज पंचायत समिती सभापती निवडणुकीतून अपहरण नाट्याचा प्रकार घडला आहे..शिवसेना शिंदे गटाच्या पंचायत समिती सदस्याचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडत आहे. निवडीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिवसेना शिंदे गटाचे बुधगाव गणातून निवडून आलेले पांडुरंग इंगळेंचे त्यांच्या शेतातून अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी करत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.मिरज पंचायती समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले असून सभापती निवडीत महायुती सोबत जाण्याची भूमिका घेतली आहे,मात्र विरोधकांकडून प्रभावाच्या भीतीने हे अपहरण करण्यात आल्याचा आरोप देखील,शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.या घटनेमुळे मिरज पंचायत समिती सभापती निवडणूक मध्ये महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
यवतमाळ जिल्ह्याचा पारा 39 अंशावरउन्हाचा पारा 39 अंशांवर पोहोचले आहे सुरुवातच कडक ऊन्हाने झाल्यामुळे विविध आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. गत दहा वर्षाच्या उचांकी तापमानाचे रेकॉर्ड मोडीत काढणारे यंदाचे तापमान असून दरवर्षी मार्च अखेरीस यवतमाळच्या तापमानात वाढ होते. यावर्षीचे तापमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वाढले आहे राजस्थान आणि गुजरात मधील उष्ण वारे थेट जिल्ह्याच्या दिशेने वाहण्यास सुरुवात झाले आहे याचा परिणाम तापमान वाढीवर झाला आहे.
Maharashtra Live News Update : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 1100 कोटी रूपयांची ऊस बिले थकलीसोलापूर जिल्ह्यातील 31 साखर कारखान्यांनी चालू हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 1100 कोटी रूपयांची ऊस बिले थकवली आहेत. ऊस बिले मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील 34 कारखान्यांपैकी फक्त तीन कारखान्यांनी शेतकर्यांना ऊसाचे पैसे दिले आहेत. उर्वरित 31 कारखान्यांनी 1100 कोटी रूपयांची बिले थकवली आहेत.
ऊसाचे पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांचे बॅंकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत.
मद्यधुंद तरुणाने स्वतःचेच घर पेटवले...आष्टी येथील खळबळजनक घटनाभंडारा जिल्ह्यातील गोबरवाही जवळील आष्टी येथे एका मद्यधुंद तरुणाने स्वतःच्या राहत्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी येथील रहिवासी घनश्याम बालकदास केवट (वय ३५) याने काल रात्री अतिप्रमाणात मद्यप्राशन केले होते. नशेच्या भरात त्याने रागाच्या भरात स्वतःच्याच घराला आग लावून दिली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.आग इतकी भीषण होती की ती विझवणे स्थानिक रहिवाशांच्या आवाक्याबाहेर होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी हानी टळली. मात्र, या आगीत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.घराला आग लावल्यानंतर आरोपी घनश्याम केवट घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.पोलीसानी आरोपीला उशिरा रात्री अटक केल्याची माहिती आहे.याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
यवतमाळ बस स्थानकात महिलांच्या रांगामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस प्रवासात महिलांना देण्यात आलेली 50% सवलत मिळविण्यासाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड किंवा स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले असून यवतमाळ बस स्थानकात महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्यासाठी मोठ्या रांगा लावण्याची वेळ आली आहे यामुळे भर उन्हात महिलांसह ज्येष्ठांना रांगेत उभे राहावे लागत आहे.
वाशिम जिल्ह्यात अजूनही ७ हजार १५३ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकीशालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक करण्यात आले आहे. मात्र वाशिम जिल्ह्यात अजूनही ७ हजार १५३ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील २लाख ३०हजार ९५८ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार १५३ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही. यामध्ये आधार सादर न केलेल्या २ हजार ९४७ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. वेळेत प्रमाणीकरण न झाल्यास हे विद्यार्थी नोंदणीत अवैध ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे...