युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं?
Marathi March 10, 2026 05:25 PM

नवीनतम सोने आणि चांदी किंमत अद्यतन भारत: जागतिक राजकारणातील तणाव आणि इराण इस्त्रायल युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका जन सामान्यांना बसत आहे. मौल्यवान धातुंसह गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडणार हे निश्चित. सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे.  मेपर्यंत अनेक घरांत सनईचे सुर घुमू लागतील. लग्न म्हटलं सोनं अन् चांदीची खरेदी होतेच.  दरम्यान, जागतिक पातळीवर सुरु असलेल्या युद्धजन्य स्थितीचा थेट फटका सामान्यांच्या खिशाला बसत आहे.  सोन्यासह चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने चांगलीच उसळी घेतलीये.

मुंबईत आज सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.   आज प्रति तोळा सोनं 1 लाख 65 हजार 249 रुपयांनी विकला जात आहे. मुंबईत काल 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 64 हजार 355 रुपये इतका होता. कालच्या तुलनेत आज  सोन्याच्या दराने उसंडी घेतली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 900 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी नक्कीच खिशाला कात्री बसणारी ही माहिती म्हणावी लागेल.

दरम्यान, सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीची चमक काही कमी होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. प्रति किलो चांदी 2 लाख 81 हजार 14 रुपयांनी सराफाच्या बाजारात विकली जात आहे.  सोन्यासह चांदीच्याही दरात चकाकी पाहायला मिळत आहे. सोनं महागल्यामुळे काही ग्राहक चांदीकडे वळतात. मात्र, सोनं आणि चांदीच्या दरात होणारी वाढ पाहून ग्राहक चिंतेत पडले आहेत.

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार,  भारतात आज 24 कॅरेट 1 तोळं  सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे.  10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,62,380 रुपये मोजावे लागतील. तर, 24 कॅरेट 10 तोळं सोन्याच्या दरामागे 7000 रुपयांची वाढ झाली आहे. 100 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 16,23,800 रुपये मोजावे लागतील.

22 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली आहे.  10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,48,850 रुपये मोजावे लागतील.  तर, 22 कॅरेट 10 तोळं सोन्याच्या दरात 6,500 रुपयांची वाढ झाली आहे.  100 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 14,88,500 रुपये मोजावे लागतील.

18 कॅरेट  सोन्याच्या दरानेही उच्चांकी गाठली आहे. 18 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली आहे.  10 ग्रॅम  सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,21, 790 रुपये मोजावे लागतील. तर, 18 कॅरेट  10 तोळं सोन्याच्या दरात  5,300 रुपयांची वाढ झाली आहे.  100 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 12,17,900 रुपये मोजावे लागतील.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.