नाशिकमध्ये स्वघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाने चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी स्वतः अशोक खरात यांची कसून चौकशी केली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या चौकशीत अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mumbai Live प्रोटोकॉल मुद्द्यावर उपमहापौर संजय घाडी नाराजमुंबईचे महापौर आणि उपमहापौर हे शहराचे प्रथम आणि द्वितीय नागरिक असल्याने त्यांच्या पदाचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत उपमहापौर संजय घाडी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमांदरम्यान प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करून महापौर आणि उपमहापौरांना योग्य तो मान मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी मांडली. हा प्रश्न व्यक्तीपुरता मर्यादित नसून पदाच्या प्रतिष्ठेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट करत प्रशासनाने याबाबत संवेदनशीलता दाखवावी, असेही सांगितले. तसेच या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले.
Chhatrapati Sambhajinagar Live बिडकीनमध्ये गॅस तुटवड्याने नागरिकांची धावपळ वाढलीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही बिडकीनमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा होईल या भीतीने नागरिकांची एजन्सीसमोर मोठी गर्दी होत आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथील गॅस एजन्सीत मागील काही दिवसांपासून सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांना गॅस घेण्यासाठी आणि नोंदणीसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. गॅसची नोंदणी करूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने आज सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने एजन्सीसमोर जमले होते. गॅस उपलब्ध होणार की नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांनी सकाळपासून प्रतीक्षा केली असून गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन एजन्सी मालकाने दुपारनंतर गॅसची गाडी येणार असून वितरण सुरू होईल अशी माहिती दिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी नियमित पुरवठा कधी सुरळीत होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Gudipadwa Live: नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह ; महिलांची भव्य बाईक रॅलीगुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबई शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सणाचा उत्साह शहरभर पाहायला मिळत असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत केले.
याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांनी भव्य रॅलीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या रॅलीत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांनी या रॅलीत सहभाग घेतल्याने वातावरणात सणाचा आनंद आणि उत्साह अधिकच वाढला.
Gudipadwa Live: बारामतीत युगेंद्र पवारांनी साजरा केला गुढीपाडवा; “मिस यू अजित काका” म्हणत केली भावनिक पोस्टबारामतीमध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी Yugendra Pawar यांनीही आपल्या कुटुंबासोबत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला.
या खास प्रसंगी Sunetra Pawar, Parth Pawar आणि Jay Pawar यांच्यासोबतचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये सर्वजण सणाच्या पारंपरिक वेशभूषेत दिसत असून आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे.
Gudipadwa Live : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूकहिंदू नववर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याण शहरात यंदा भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. कल्याण सांस्कृतिक मंच आणि जैन समाज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकाराने आयोजित या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
Gudipadwa Live: पारंपारिक पोशाखात महिला, तरुण तरुणींनी काढली महाडमध्ये शोभा यात्राआज सर्वत्र मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचा उत्साहाचा माहोल पहायला मिळत आहे. या निमित्ताने रायगडमध्ये ठिकठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आल आहे. रायगडच्या महाड शहरात सकाळी महिला तरुण तरुणांनी पारंपारिक वेशभूषात शोभा यात्रा काढली. ढोल ताशा आणि खालूच्या गजरात लेझिम नाचत, मर्दानी खेळाची प्रात्याक्षिक या रॅलीदरम्यान दाखवण्यात आली.
Gudipadwa Live: नवी मुंबईमध्ये गुढी पाडव्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाच आयोजनगुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबई शहरांमध्ये विविध कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेले अशाच प्रकारे गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं
Buldhana Live: डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळलीबुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे आज सकाळी अवकाळी पावसासह झालेल्या विजांच्या कडकडाटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या दरम्यान आरेगाव रोडवरील वार्ड क्रमांक २ मधील खंडोबा मंदिरावर अचानक वीज कोसळल्याची घटना घडली. या घटनेत मंदिराच्या काही भागाचे नुकसान झाले असून, त्या वेळी मंदिरात पूजा करत असलेल्या महिलेचा सुदैवाने थोडक्यात बचाव झाला. मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. वीज कोसळल्यामुळे मंदिराच्या रचनेला काही प्रमाणात हानी पोहोचली असून, स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वादळी पावसाच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Rupali Patil Live : अशोक खरात प्रकरणी वर्षभरापूर्वी महिला आयोगाकडे तक्रार होतीअशोक खरात प्रकरणी वर्षभरापूर्वी महिला आयोगाकडे तक्रार होती पण आयोगाने कारवाई का केली नाही असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला आहे.
Ashokk harat Update Live : खरातप्रकरणी राज्य सरकारकडून गंभीर दखलअशोक खरात प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे.
Dhananjay Mahadik : कोल्हापूर-मुंबई स्लिपर वंदे भारत रेल्वे सातही दिवस सुरू करावी, खासदार धनंजय महाडिक यांची मागणीकोल्हापूर : आठवड्यातील सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर स्लिपर वंदे भारत रेल्वे सुरू करावी, तसेच सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावावी, अशा दोन मागण्या खासदार धनंजय महाडिक यांनी संसदीय अधिवेशनात मांडल्या.
Dagdusheth Ganpati Temple : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दीचैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच, हिंदू सणांपैकी गुढीपाडवा या सणाला विशेष महत्व आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने व्हावी म्हणून, आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
Kolhapur News : टोपमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यूनागाव : टोप (ता. हातकणंगले) येथील महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. सुनीता सर्जेराव पाटील (वय ५५, रा. टोप, ता. हातकणंगले) असे मृत महिलेचे नाव आहे. कासारवाडी येथील शेतात काम करताना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांना सर्पदंश झाला होता. कोल्हापुरातील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रमोद पाटील याने त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, विषाचा संसर्ग शरीरात जास्त झाल्याने उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली.
New Delhi News : गुढीपाडवा, रमजान ईद लक्षात घेत अधिवेशनाच्या कामकाजात बदल, आज व उद्या संसदेला सुटीनवी दिल्ली : गुढीपाडवा, उगाडी आणि रमजान ईद लक्षात घेऊन संसद अधिवेशनाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. लोकसभेने उद्या आणि शुक्रवारी (ता.२०) सभागृहाच्या बैठका रद्द केल्या आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सभागृहात याची घोषणा केली. आता शनिवारी, रविवारी संसदेचे अतिरिक्त कामकाज होईल. त्यात आवश्यक कामकाज मार्गी लावण्यात येणार आहे. या दिवशी होणाऱ्या विशेष बैठकींदरम्यान प्रश्नोत्तराचा तास न होता अन्य कामकाज पूर्ण करण्यावर भर राहील. लोकसभे प्रमाणेच राज्यसभेतही शनिवारी-रविवारी अधिक कामकाज होणार आहे.
Gudi Padwa Shegaon : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेगावात भक्तांची मोठी गर्दी; 'गण गण गणात बोते'चा जयघोषचैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. मराठी नववर्षाचे स्वागत देवदर्शनाने करण्याची परंपरा जपत राज्यभरातून हजारो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. श्री संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.
Pandharpur News : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावटपंढरपूर : चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, त्यामुळे श्रींचा गाभारा अत्यंत मनमोहक व प्रसन्न दिसत आहे. याच निमित्ताने विठुरायाला पाच किलो वजनाचा साखरेचा हार अर्पण करण्यात आला आहे.
Chief Minister Devendra Fadnavis : आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुढीपाडव्याच्या निमित्ताने वक्तव्यनववर्ष साजरे करण्यासाठी मी येथे आलो आहे.
आजचा दिवस प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नव्या आशा आणि उमेदीने आपण जीवनाकडे पुढे जातो.
येथे अतिशय सुंदर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर भगवामय झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची ही गुढी अशीच उंचावत राहो, हीच शुभेच्छा.
नागाव : शिरोली औद्योगिक वसाहतीत फिरणाऱ्या सांगलीच्या तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. राजवर्धन आनंदराव पाटील (वय २१, रा. आंबा चौक, कुपवाड रोड, सांगली) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिरोली औद्योगिक वसाहत पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागीहिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित शोभायात्रेत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम या त्यांच्या मतदारसंघातील आठ रस्ता चौकातून उत्साहात सहभाग नोंदवला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही गुढीपाडव्याच्या निमित्ताने ते या शोभायात्रेत आवर्जून हजेरी लावत असून, हिंदू नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले.
Gudi Padwa : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होणारआज, गुरुवार दि. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण राज्यभर उत्साहात साजरा केला जात आहे. या मंगल दिनानिमित्त मराठी नववर्षाचे स्वागत आनंद, उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने केले जाते. या शुभ प्रसंगी एकमेकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत, नववर्ष सुख, समृद्धी आणि आनंदाने भरलेले जावे, अशी मनापासून प्रार्थना केली जाते.
Captain Kharat : 'हायप्रोफाइल' भोंदू कॅप्टन खरातला ठोकल्या बेड्याLatest Marathi Live Updates 19 March 2026 : अंक ज्योतिषाच्या आडून ‘भविष्य बदलण्याचे’ आमिष दाखवत उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या अशोककुमार खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ खरातचा विकृत चेहरा अखेर समोर आला आहे. महिलांच्या वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत ‘विधी’च्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणाऱ्या या भोंदूला गुन्हेशाखेच्या पथकाने काल पहाटे गोविंदनगर परिसरातील त्याच्या बंगल्यात बेड्या ठोकल्या. जिल्हा न्यायालयाने खरातला येत्या २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.