भारतीय क्रिकेटमधला गेमचेंजर माणूस, त्यांच्या अचूक निर्णयांमुळे जिंकले दोन वर्ल्ड कप, मुदत संपण्याआधी बीसीसीआयने त्याला थांबवावं
Tv9 Marathi March 19, 2026 05:45 PM

टीम इंडियाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकलेत. मैदानावर खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे हे यश शक्य झालं, यात कुठलही दुमत नाही. पण मैदानबाहेरील एका माणसाचा भारतीय क्रिकेटच्या यशात मोठा वाटा आहे. त्याच्या कॉन्ट्रॅक्टची मुदत संपत येतेय. त्याआधीच बीसीसीयाने त्याला थांबवावं. कारण वनडे वर्ल्ड कप वर्षभरावर आलाय. अजित आगरकर टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर बनल्यापासून भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता अजित आगरकर यांनी बीसीसीआय समोर एक खास डिमांड ठेवली आहे. बीसीसीआयने आगरकर यांची डिमांड मान्य केली तर त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळेल. रिपोर्ट्सनुसार अजित आगरकर यांनी चीफ सिलक्टर म्हणून कॉन्ट्रॅक्ट वाढवावा अशी बीसीसीआयकडे मागणी केली आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप पर्यंत आपल्याला चीफ सिलेक्टर या पदावर काय ठेवावं अशी आगरकर यांनी बीसीसीआयकडे मागणी केली आहे.

अजित आगरकर यांना बीसीआयने आधीच एक वर्षाचं एक्सटेंशन दिलं आहे. आता पुन्हा त्यांना संधी मिळेल का? हा प्रश्न आहे. अजित आगरकर यांचं रिपोर्ट कार्ड कमालीच आहे. भारताच्या या माजी क्रिकेटरने चीफ सिलेक्टर म्हणून जी टीम निवडली त्याने वर्ल्ड कप 2024, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआणि टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अजित आगरकर यांनी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट अजून वर्षभरासाठी वाढवण्यात यावा, यासाठी अर्ज दिला आहे. बीसीसीआयमध्ये यावर चर्चा सुरु आहे.

दोघांनी मिळून भारतीय क्रिकेटमध्ये केले मोठे बदल

अजित आगरकर यांच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे हेड कोच गौतम गंभीर यांचं त्यांना पूर्ण समर्थन आहे. दोघांनी मिळून भारतीय क्रिकेटमध्ये काही मोठे बदल केलेत. भारतीय टीमसाठी यंदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण कठीण दिसतय.

अजित आगरकर यांनी आपल्या कार्यकाळात तीन मोठे निर्णय घेतले. त्यावरुन वादविवाद झाला. पण टीम इंडियाला फायदा मिळाला.

हार्दिक पंड्याची टी20 टीमच्या कॅप्टनशिपसाठी चर्चा असताना त्यांनी सूर्यकुमार यादवला टीमचं कॅप्टन नियुक्त केलं. हा निर्णय योग्य ठरला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला.

दुसरा मोठा निर्णय इशान किशनच सिलेक्शन. टी20 वर्ल्ड कप 2026 आधी इशान किशनची टीम इंडियात निवड हा मास्टर स्ट्रोक ठरला. त्याने टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये कमाल प्रदर्शन केलं.

अजित आगरकर यांचा तिसरा मोठा निर्णय म्हणजे रोहित शर्माला वनडे टीमच्या कॅप्टनशिपवरुन हटवणं. रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली मात्र तरीही त्याला कॅप्टनशिपवरुन हटवण्याचा निर्णय साहसी होता. शुबमन गिलला वनडे, टेस्ट टीमचं कॅप्टन बनवलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.