अर्जुन तेंडुलकर नुकताच त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला होता. ५ मार्च रोजी त्याने सानिया चंदोक हिच्याशी मुंबईमध्ये लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नासाठी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजही उपस्थित होते. दरम्यान, आता लग्नानंतर तो २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत यंदा तो लखनौ सुपर जायंट्सकडून खेळेल.
तो यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळला आहे. पण मुंबईने त्याला आयपीएल २०२६ आधी (IPL 2026) लखनौ सुपर जायंट्ससोबत (LSG) ट्रेड केले. त्यामुळे आता अर्जुनसाठी (Arjun Tendulkar) लखनौ हा आयपीएलमधील दुसरा संघ असणार आहे. या संघाचा कर्णधार सध्या रिषभ पंत (Rishabh Pant) आहे.
Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viralलखनौच्या सरावाला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान रिषभ पंत आणि अर्जुन तेंडुलकरची एकाना स्टेडियमवर सरावादरम्यान भेट झाली, त्यावेळी त्यांच्या झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ समोर आला आहे. या वेळी रिषभ पंत अर्जुनची साधारण ओळख करून घेत असल्याचे दिसत आहे. त्याने त्याला त्याच्या बॅटच्या वजनाबद्दलचीही चौकशी केली. हा व्हिडिओ लखनौ सुपर जायंट्सनेच शेअर केला आहे.
यात दिसते की आधी रिषभ अर्जुनला त्याच्या बॅटच्या वजनाबद्दल विचारपूस केली. यावेळी अर्जुनने त्याच्या बॅटचं वजन सांगताना त्याचे वडील सचिन तेंडुलकर त्यापेक्षाही जड बॅट वापरायचे, असंही त्याने सांगितले. अर्जुन रिषभला म्हणाला, '१२०० ग्रॅम. टच केला, तरी काम होतं. पप्पा तर १३१०-१३१५ वापरायचे. मी १२०० पेक्षा कमी वजनाची बॅट वापरतच नाही.' हे ऐकून रिषभ आश्चर्यचकीत झाल्याचे पाहायला मिळाले.
Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viralत्यानंतर रिषभने अर्जुनला तो युवराज सिंगसोबतही सराव करत असल्याचे विचारले. त्यावेळी अर्जुनने त्याच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सराव केल्याचे ऐकून रिषभ चकीत झाला. रिषभ म्हणाला, 'युवीपा सोबतही तू सराव केलास ना? तू युवीपासोबत पूर्ण वेळ सराव केला, तेपण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी? भाई तू खूपच उत्साही आहे.' शेवटी रिषभने त्याला काही लागलं तर सांग असंही सांगितलं.
अर्जुनने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ५ सामने खेळले आहेत. तो देशांतर्गत क्रिकेट गोव्याकडून खेळतो. त्याने आत्तापर्यंत २४ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून ५२ विकेट्स घेतल्या आहेत आणि ६८५ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २४ सामन्यांत २६ विकेट्स घेतल्या असून १६० धावा केल्या आहेत. २९ टी२० सामने खेळले असून ३५ विकेट्स घेतल्या आहेत, तर १८९ धावा केल्या आहेत.