'ढोंगी साध्वी' ना भगवे कपडे ना गळ्यात कोणत्या माळा, संन्सास घेणारी ममता कुलकर्णी दिसली ग्लॅमरस लूकमध्ये Viral Video
esakal March 19, 2026 11:45 PM

MAMTA KULKARNI’S BOLD LOOK CREATES BUZZ: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्सास घेतल्याचं जाहिर केलं होतं. 2025 मध्ये महाकुंभात तिने किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्विकारलं होतं. त्यावेळी तिची प्रचंड चर्चा झाली. परंतु नंतर तिला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं. दरम्यान आता पुन्हा चर्चेत आलीय. तिचा मार्डर लूकमधील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलय.

ममता कुलकर्णी तिच्या मैत्रिणीसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेली होती. तेव्हा ती पुन्हा तिच्या ग्लॅमरस लूकमध्ये पहायला मिळाली. तिचा मित्रांसोबत गोव्याला जातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिने गोव्याचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत. एका व्हिडिओमध्ये ती तिच्या मैत्रिणींची ओळख करुन देतेय.

दरम्यान तिचा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलय. अनेकांनी कमेंट करत 'चंदनाचा टिळा पुसून टाकला का' असा सवाल उपस्थित करताय. तसंच एका युझरने कमेंट करत विचार की, 'ही साध्वी नाहीतर ढोंगी आहे' अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत तिला ट्रोल केलय. तर एका युझरने तिची बाजू घेत 'तिच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे' असही सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by MAHAMANDLESHWAR YAMAIIMAMTA NANDGIRI (@mamtakulkarnimk)