इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत राजस्थान रॉयल्सच्या संघाकडे लक्ष असणार आहे. राजस्थानने या स्पर्धेच्या लिलावापूर्वी संजू सॅमसनला रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्सला ट्रेड केलं होतं. ज्यावेळी राजस्थानने संजूला ट्रेड केलं, त्यावेळी तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता.
माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणारसंजू ११ हंगाम राजस्थानकडून खेळला असून गेल्या काही हंगामात तो संघाचा कर्णधारही होता. त्याच्या नेतृ्त्वात राजस्थानने २०२२ मध्ये उपविजेतेपद मिळवले होते. मात्र आता तो चेन्नई संघात गेल्यानंतर त्याच्या जागेवर राजस्थानने रियान परागला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. परागने २०२५ आयपीएल हंगामात ज्यावेळी संजूला दुखापत होती, त्यावेळी त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र आता संजूची कमी भरून काढण्याचं मोठं आव्हान राजस्थानसमोर आहे, याबाबत आता रियान परागने नुकतेच भाष्य केले आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पराग जयपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होता. तो म्हणाला, 'जर तुम्ही संजू भैय्याबद्दल बोलत असाल, तर त्याची जागा कोणी घेईल, असा विचारही आम्ही करत नाही, अशा प्रकारचा तो खेळाडू होता. आम्ही त्याच्यासारखे कौशल्य असलेल्या खेळाडूचा कदाचित शोध घेऊ शकतो किंवा त्याच्याजागी कोणाला तरी फलंदाजी करायला सांगू शकतो. हे असे आहे की जसे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना कोणताही पर्याय नाही. त्याप्रमाणेच संजू भैय्याला देखील बदलीचा पर्याय नाही, कारण तो इतका चांगला खेळाडू आहे.
संजू सॅमसनने आयपीएलमध्ये २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते. तो २०१३ ते १०१५ आणि नंतर २०१८ ते २०१५ या दोन टप्प्यात राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षी राजस्थानवर बंदी असताना त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी १५५ सामने खेळताना २ शतके आणि २६ अर्धशतकांसह ४२१९ धावा केल्या.
दरम्यान, आता आयपीएल २०२६ मध्ये नेतृत्व करण्याबाबत रियान पराग म्हणाला की आता नीट योजना आखाव्या लागतील. गेल्यावर्षी ५-६ सामने शेवटच्या क्षणी पराभूत झाले होते. त्यामुळे यावेळी ते विजयाचे अंतर पार करावे लागले. त्याने असंही म्हटले की टी२० सामन्यांत ३-४ निर्णय असे असतात, जे संपूर्ण सामन्याचं रुप पालटू शकतात. त्यामुळे योग्य योजना आणि रणनीतीने असे छोटे निर्णय़ घ्यावे लागतील. त्याने हे वर्ष वेगळे असेल, असंही म्हटलंय.
'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं रियानची कशी झाली कर्णधार म्हणून निवड?रियानची राजस्थानचा कर्णधार म्हणून निवड कशी झाली हे सांगताना मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराने सांगितले की रियान पराग आता परिपक्व झाला आहे. तो म्हणाला, 'जेव्हा संजूने संघ सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आमच्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करणे गरजेचे होते. आम्ही काही खेळाडूंना शॉर्ट लिस्ट केले. त्यानंतर अत्यंत कठीण मुलाखत प्रक्रिया केली. रियानला माहित आहे की प्रश्न कठीण होते. अखेर मनोज बदाले आणि मी विचार केला आणि राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करण्यासाठी रियानच योग्य असल्याचा निर्णय घेतला.'