IPL 2026: आयपीएल सामन्यात या फलंदाजाने 31 चेंडूत एकही धाव काढली नाही, दिग्गज फलंदाजही यादीत
GH News March 20, 2026 01:10 AM

IPL Facts: आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार असून पहिल्या टप्प्यातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यामुळे उर्वरित वेळापत्रक विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर समोर येईल. असं असताना आतापासूनच काही विक्रमांची चर्चा रंगली आहे. आयपीएलमधील काही विक्रम हे आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. आज आपण अशाच एक विक्रमाबाबत जाणून घेणार आहोत. खरं तर हा विक्रम फलंदाजांचा नावडता आहे. कारण एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू घालवण्याचा हा नकोसा विक्रम आहे. एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू घालण्याचा विक्रम कोणच्या नावावर असणार? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण टॉप 5 नाव ऐकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. चला जाणून घेऊयात या यादीत कोण आहे ते…

आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळणारे खेळाडू

आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू घालवण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत त्याने हा नकोसा विक्रम रचला होता. त्याने सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना पंजाब किंग्सविरुद्ध 31 चेंडूत एकही धाव काढली नव्हती. हे 31 चेंडू सलग खेळले नाहीत. पण धावा करताना इतके चेंडू वाया घालवले. धवनने या सामन्यात एकूण 66 चेंडू खेळले आणि 99 धावा केल्या. म्हणजे 11 षटकं एकटा खेळला आणि 3 चेंडू म्हणजेच 5 षटकं वाया घालवली.

ड्वेन ब्राओ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्याने 12 मे 2009 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना 30 चेंडू वाया घालवले. यावेळी त्याने 59 चेंडूत 70 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंच आणि वेस्ट इंडिजचा माजी ओपनर ड्वेन स्मिथ हे देखील या यादीत आहे. या दोघांनी प्रत्येकी 29 चेंडू वाया घालवले आहेत. तर जोस बटलरने मुंबई इंडियन्ससाठी खेळताना 2022 मध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 28 चेंडू निर्धाव घालवले होते.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळणारे खेळाडू

आयपीएल स्पर्धेच्या आतापर्यंत 18 पर्वात सर्वाधिक निर्धाव चेंडू खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 18 पर्वात 2152 चेंडू निर्धाव घालवले आहेत. यात यंदाच्या पर्वात भर पडेल. यात काही शंका नाही. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 2015 निर्धाव चेंडू घालवले आहेत. शिखर धवनने 1977 आणि डेविड वॉर्नरने 1723 चेंडू निर्धाव घालवले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.