भोंदूबाबा अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध आहे का? अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या पुजेचं कनेक्शन काय? मिटकरींचे सवाल
उमेश अलोणे, एबीपी माझा March 20, 2026 01:13 AM

Amol Mitkari on Captain Ashok Kharat : भोंदूबाबा असणारा कॅप्टन अशोक खरात याचा व्हीएसआर कंपनीशी काय संबंध आहे का? याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजित पवारांच्या बारामती आणि मुंबईतील घराबाहेर झालेल्या आघोरी पूजेचे कनेक्शन कॅप्टन अशोक खरातसोबत आहे का? याची देखील चौकशी व्हावी असे मिटकरी म्हणाले.  आमदार अमोल मिटकरी

कॅप्टन खरात याचा 'व्हीएसआर कंपनी'च्या विमानासोबत फोटो केला ट्विट 

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात संदर्भात एक खळबजनक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये आमदार मिटकरी यांनी कॅप्टन खरात याचा 'व्हीएसआर कंपनी'च्या विमानासोबत एक फोटो ट्विट केला आहे. कॅप्टन खरात याचे 'व्हीएसआर कंपनी'चा मालक व्ही. के. सिंग यांच्याशी काही संबंध आहे काय?, याचा तपास करण्याची मागणी केली आहे. यासोबतच अजित पवारांच्या बारामती आणि मुंबई येथील निवासस्थानाबाहेर केलेल्या आघोरी पूजेशी कॅप्टन खरात याचा संबंध आहे का?, याचा तपास घेण्याची मागणी केलीयै. कॅप्टन खरातसंदर्भात चौकशीसाठी नियुक्त केलेल्या 'एसआयटी'ने या दृष्टीनेही तपास करावा, अशी विनंती आमदार मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे. या तपासातून नक्कीच अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल महत्वाचे धागेद्वारे मिळतील, असा विश्वासही आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.